भारतातील सर्व प्रसिद्ध मंदिरांपैकी बुद्धविहार हे पहिले मंदिर, जे हिंसेद्वारे ब्राह्मणांनी काबीज केले. ब्राह्मण पुराणात ब्राह्मणांनी बुद्धमूर्तीच्या तोंडाकडेही पाहू नये असे लिहिले आहे. बुद्धांचे तोंड पाहणे हे ब्राह्मण सर्वात मोठे पाप मानतात, मग आज त्या महाविहारावर ब्राह्मण का कब्जा करत आहेत? मशिदी, चर्च आणि गुरुद्वारांवर त्या धर्मांचे पालन न करणाऱ्या लोकांचा ताबा नाही. अगदी नुकत्याच झालेल्या राम मंदिर ट्रस्टीमध्ये कोणत्याही अहिन्दू, गैरब्राह्मण लोकांना स्थान नाही. मग बोधगया महाबोधि महाविहाराच्या ट्रस्टीवर ब्राह्मणांचा ताबा का? याचे कारण एकच, ही वास्तू जागतिक वारसा आहे. या ठिकाणी प्रचंड आर्थिक देवाण-घेवाण दानाच्या रूपाने होत असते. इथे येणारे प्रचंड दान हा आर्थिक स्त्रोत इथले ब्राह्मण सोडायला तयार नाहीत. तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी 1949 मध्ये महाबोधी महाविहारावर विदेशी ब्राह्मणांचा कब्जा ठेवणारा हा कायदा लागू केला. त्या कायद्यात महंत ब्राह्मण हे महाबोधी महाविहारचे अर्धे मालक दाखवले आहेत. आणि वंशपरंपरागत महंत ब्राह्मण त्या ठिकाणी राहतील असे लिहिले आहे. तर ते शंकराचार्यांचे शिष्य आहेत. बौद्ध भिख्खूंची हत्या करणाऱ्या आदि शंकराचार्यांची परंपरा टिकवण्यासाठी महंतांनी महाविहार ताब्यात घेतले? या कायद्याच्या कलम 10 (4) आणि 11 अंतर्गत, ब्राह्मण त्या बौद्ध ठिकाणी पूजा आणि पिंडदान देऊ शकतील. तसेच बीटीएमसी (बोधगया व्यवस्थापन समिती) द्वारे व्यवस्थापित केले जाईल असे लिहिले आहे. हे त्या पवित्र ज्ञानस्थानावर सांस्कृतिक आक्रमण आहे. बोधगया महाविहाराचे मागिल अनेक वर्षापासून उघड ब्राह्मणीकरण होत आहे. कलम 13 मध्ये हिंदू आणि बौद्धांमध्ये कोणताही वाद झाल्यास अंतिम निर्णय बिहारचे मुख्यमंत्री घेतील, म्हणजेच तुम्ही न्यायालयातही जाऊ शकत नाही, असे लिहिले आहे. अशा प्रकारे हा कायदा काळा कायदा असून तो नष्ट केल्याशिवाय पर्याय नाही
याकरिता समस्त विश्वातील बौद्धांच्या अस्मितेचे असलेले पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनास बौद्धजन पंचायत समिती जाहीर पाठींबा देवून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागृत करण्याकरिता समितीचे सभापती, माननीय आनंदराज आंबेडकर यांनी महाड क्रांतिभूमी येथे सम्राट अशोक जयंतीदिनी अर्थात शनिवार दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२. वा. मुंबईतील भायखळा येथील राणीबाग ते आझाद मैदान असा भव्य महामोर्चा सर्व धार्मिक, सामाजिक आणि राजकीय संघटना यांच्यासमवेत काढण्याचे आवाहन केले आहे. महाबोधि महाविहार मुक्तीकरिता एक कृतीशील आंदोलन उभारण्याचा प्रयत्न बौद्धजन पंचायत समिती करीत आहे. समितीचे सर्व विश्वस्थ, मुख्य कार्यकारिणी, मध्यवर्ती महिला मंडळ, समितीशी संबंधित सर्व बौद्धाचारी, सर्व शाखा पदाधिकारी सभासद बंधू भगिनी आणि समस्त बौद्धजन समाजाने लाखोंच्या संख्येने या महामोर्चात सहभागी होवून समस्त विश्वातील बौद्धांचे पवित्र स्थळ बौद्धांच्या ताब्यात घेण्याकरिता सुरू असलेले आंदोलन यशस्वी करण्यास आपले योगदान द्यावे, असे बौद्धजन पंचायत समितीतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या