कल्याण (पूर्व), कामना नगर येथील नव-सागरदीप सहकारी गृह निर्माण संस्था (मर्या.) यांच्या वतीने १४ एप्रिल रोजी कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. संस्थेतील चाळ क्रमांक २ आणि ३ मधील पॅसेज मध्ये आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११ वाजता धम्म वंदनेने झाली. परिसरात धार्मिक आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत लहान मुलांसाठी विविध खेळ आणि स्पर्धा तसेच महिलांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम राबवण्यात आले, ज्यांना उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रात्री ८ ते ९ या वेळेत रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संस्थेच्या महिला व बाल कलाकारांनी गीत, नृत्य आणि नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांना भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाबाबत बोलताना संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र बांधगळे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याचे प्रतीक असून त्यांनी दिलेल्या शौर्य व न्यायप्रियतेच्या मूल्यांवर आपण चालत आहोत. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला संविधानाचा प्रकाश आजही आमच्या वाटचालीस दिशा दाखवत आहे. त्यांचा हा संयुक्त जयंती सोहळा ही आपल्या संस्थेच्या सामाजिक एकतेचे व सांस्कृतिक जाणीवेचे साक्षात्कार आहे.”
संस्थेचे सचिव दिलीप मोहिते म्हणाले, “शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि बाबासाहेबांची बौद्धिक क्रांती यांचा संगम म्हणजे आपली आजची प्रगती. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणाने आजचा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. संस्थेच्या सर्व सदस्यांचे, स्वयंसेवकांचे आणि सहभागी नागरिकांचे मन:पूर्वक आभार.”
या कार्यक्रमामुळे परिसरात उत्सवाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी संस्थेचे खजिनदार नारायण नारकर, कमिटी सदस्य अनंत सागवेकर, चंद्रकांत कुंभार, तानाजी कांबळे, श्रीमती तारा जाधव, कविता भाकरे, स्वप्नील जाधव, उत्सव कमिटी प्रमुख विलास सागवेकर, अधिक लोखंडे, नितेश जाधव, अनिकेत मोहिते, राकेश चव्हाण, विकास जाधव, संजय नवगिरे, रवी कोणार यांच्यासह विभागातील नागरिक, तरुण कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.हा सोहळा परिसरातील सामाजिक ऐक्य, इतिहासाची जाण आणि संस्कृतीचा अभिमान व्यक्त करणारा ठरला.
................................................
*डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुप बदलापूरच्या वतीने भीमजयंती उत्साहात साजरी
डॉ. बी आर आंबेडकर ग्रूप पनवेलकर संकुल बदलापूर यांच्या विद्यमाने *दि.१४ एप्रिल दिनी विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वा जयंती उत्सव-२०२५* अतिशय मोठ्या जल्लोषात, थाटामाटात पनवेलकर संकुल या ठिकाणी पार पडला. कार्यक्रमाची सुरवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार, दिपप्रजोलन करुन सुषमाताई तायडे यांच्या अमृत वाणीतून बुद्धवंदना पार पडली.कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते आयु. महेश जाधव साहेब आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ. प्रतिभाताई जाधव होत्या त्यांनी मोलाचे मार्गदर्शन करून जयंतीच्या सर्वांना शुभेच्या दिल्या.
लहान मुले आणि महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केलेलं होते . सहभागी सर्व स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. लहान मुलांच्या कलेला वाव मिळावा या हेतूने विविध मनोरंजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक मुला- मुलींनी महापुरुषांच्या जीवना आधारित भाषणे , गीत गायन आणि नृत्ये केली. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यात डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रूप संकुलमधील सर्वच युवकांनी मोलाचे योगदान दिले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 टिप्पण्या