विधिमंडळ परिसरात आज अनेक वृत्तसंकलन करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींच्या लक्षात आले की,"विधिमंडळ वार्ताहर"नावाच्या विशेष (आयकार्डसह )पट्ट्या काहींच्या गळ्यात अडकवल्या होत्या,या पट्ट्या विधिमंडळ सचिवालयाने वाटप केलेल्या असाव्यात म्हणून,काही पत्रकारांनी या बातमीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,त्यावेळी अनेक मजेशीर बाबींचा उलघडा झाला.मंत्रालयातील काही ठराविकच वार्ताहराना अशा विशेष पट्ट्या देण्यात आल्या असून त्यांची शिफारस, माहिती व जनसंपर्क विभागाने केलेली आहे, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी अधिवेशन कव्हर करणारे काही पत्रकार विधिमंडळ सचिवांच्या कार्यालयात पोहोचले, त्यांनी या "ठराविक पट्ट्यांचे"कारण जाणून घेतले असता त्यांना मजेशीर माहिती मिळाली.
मंत्रालयातील १६० वार्ताहराना सचिवालयाने विशेष आय कार्ड व विधिमंडळ वार्ताहर नावाच्या विशेष पट्ट्या देण्यात आल्याचे तसेच त्यांची शिफारस माहिती जनसंपर्क खात्याने केल्याचे सचिव जितेंद्र भोळे यांनी यावेळी सांगितले ,कुणाला अशा पट्ट्या हव्या असतिल तर त्यांनी मंत्रालयामार्फत यावे हा सल्लाही विधिमंडळ सचिवांनी उपस्थित पत्रकारांना दिला, सचिवालयाच्या या अजब निर्णयामुळे अधिवेशन कव्हर करणाऱ्या पत्रकारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे की, अधिवेशनाचे पासेस विधिमंडळ सचिवालय देत असते मग ठराविक वार्ताहराना "अशा विधिमंडळ वार्ताहर"नावाच्या पट्ट्यांचे वाटप कसे काय होते ? विधिमंडळ सचिवालय पत्रकारांमध्ये भेदभाव निर्माण करत आहे का ? ठराविकच पत्रकार विधिमंडळ सचिवालायचे लाडके पत्रकार आहेत का ? असे प्रश्न कव्हरेज करणाऱ्या अनेक वृत्तपत्र प्रतिनिधींच्या मनात निर्माण होत असून आता या प्रकरणी तक्रारी होण्याची शक्यता आहे !
0 टिप्पण्या