Top Post Ad

मी पुन्हा येईन...पण तुम्ही माझ्याकडे पुन्हा येऊ नका...

 मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे आझाद मैदान मुंबई येथील बेमुदत उपोषण स्थगीत करण्यात आले असून यापुढील आंदोलन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर आक्रमकतेने उभारणार.  बेरोजगारांना रोजगार द्या आणि त्यांना योग्य मानधन द्या. या मागण्या लावून धरणार आहेात. शासन जर रोजगार देणार नसेल तर बेरोजगारांसाठीचे आंदोलन अत्यंत तीव्र करू आणि शासनाला सळो की पळो करू, असा इशारा या आंदोलनाचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे. आंदोलन तीव्र करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून संघटन मजबूत करून  बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी राज्य सरकारला भाग पाडू असेही पाटील म्हणाले.

  दिनांक 3 मार्च 2025 पासून आझाद मैदान मुंबई येथे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांच्या विविध मागण्यासाठी लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांच्यासह 100 युवा कार्यप्रशिक्षणार्थी बेमुदत उपोषणास आझाद मैदानावर बसले होते.... या काळामध्ये शेकडो प्रशिक्षणार्थीनी आपले मुंडन करून शासनाचा निषेध नोंदवला. या 24 दिवसाच्या कार्यकाळात कमी अधिक 50 हजार प्रशिक्षणार्थ्यांनी आझाद मैदानावर हजेरी लावली आणि बेमुदत उपोषणात सहभाग नोंदवला. या काळामध्ये दोन वेळा कौशल्य विकास मंत्री नामदार मंगल प्रभात लोढाजी यांची विधानभवनातील कार्यालयात शिष्टमंडळासोबत चर्चा झाली या चर्चेतून मंगल प्रभात लोढा व मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्रजी फडणवीस यांनी दिनांक 7 मार्च 2025 रोजी विधानसभेत् आझाद मैदानावरील आंदोलनाची दखल घेत प्रशिक्षण कालावधी पाच महिन्यांनी वाढवला आणि पुन्हा नंतर माझ्याकडे नोकरी मागायला येऊ नका म्हणून हात जोडून विनंती केली..

या त्यांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सर्व प्रशिक्षणार्थी मध्ये प्रचंड संतापाची लाट आहे...... कारण निवडणुकीच्या अगोदर ज्या अस्थापनेमध्ये जे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत त्याच अस्थापनेमध्ये कायम होतील अशा प्रकारचं ठिकठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, यांचे व्हिडिओ आम्ही वेळोवेळी दाखवलेले आहे ते आमच्याकडे आहेत या अधिवेशन काळामध्ये विधानसभेत आणि विधान परिषदेमध्ये कमी अधिक 22 विद्यमान आमदारांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळाला पाहिजे याविषयी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयन केलेला आहे.. या आंदोलनाचे नेते बालाजी पाटील चाकूरकर यांची उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या सोबत विधान भवनामध्ये मीटिंग पण झाली पण त्या मीटिंगमध्ये ठोस असा काही निर्णय न झाल्यामुळे बोलनी फिसकटली.... 

या आझाद मैदानावर चालू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी विरोधी पक्षाचे जयंतराव पाटील विजय वडेट्टीवार, नानाभाऊ पटोले, नामदार गिरीश महाजन, सतीश पाटील व शिवसेना शिंदे गटाचे अजित पवार राष्ट्रवादीचे अनेक जण आणि साधारण 55 आमदारांनी भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिनांक 21 मार्च 2018 रोजी काँग्रेसचे आमदार नानाभाऊ पटोले यांनी विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आम्ही प्रशिक्षणार्थ्यांना अकरा महिन्याच्या पुढे काही देऊ शकणार नाही... हे दोन्ही बाजूच्या आमदारांनी लक्षात घ्यावे असे वक्तव्य करून आम्ही प्रशिक्षणार्थीना त्याच आस्थापनेत कायम करू असे कधीच बोललो नाही असे बेजबाबदार वक्तव्य विधानसभेत केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी युवकांनी युतीने हे 24 दिवसाचे आंदोलन म्हणजे पेरणीपूर्व मशागत समजावे आपले आंदोलन वाया जाणार नाही एक दिवस नक्कीच बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असा शब्द वालाजी पाटील चाकूरकर यांनी दिला आहे या आंदोलनात माजी खासदार हरिभाऊ राठोड, अनुप चव्हाण, प्रकाश साबळे, अनिकेत मांदळे, गोविंद टोम्पे, शुभम पांचाळ, सुजित कुमार, शिंदे गंगाधर, कुमठेकर आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com