मिठी नदीतील गाळ काढण्याबावत व मुंबई शहारातील मेजर नाल्यातील साफसफाई करणेबाबत निविदेतील होत असणारा घोटाळा आणि यामध्ये सहभागी असलेले महानगरपालिकेचे अधिकारी याबाबतचा पर्दाफाश आज मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. कंत्राटदार आणि अधिकारी वर्ग यांच्या अभद्र युतीमुळे महानगरपालिकेची कोट्यावधी रुपयांची लूट सुरू असल्याचा आरोपही त्यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना केला. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या भ्रष्टाचाराची सर्व माहिती दिली्
मुंबई शहरातील डिसल्टींग (Desilting) मेजर नालासफाई २०२५, २०२६, २०२७ याबाबतीत साधारण २०० कोटीहून अधिक रकमेच्या निविदा काढण्यात आल्या आहेत आणि आता १०० कोटी रकमेची मिठी नदी साफसफाईची निविदा काढण्यात आली आहे ही निविदा काढण्यात येऊ नये असे पत्र आपण मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्त यांना पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले . कारण मुंबईतील मेजर नालासफाई व मिठी नदी सफाई याकरिता काढण्यात येणाऱ्या निविदेमध्ये साधारणतः एकाच कंत्राटदाराच्या ४ ते ५ कंपन्यांचा सहभाग असून त्यांनाच निविदा मिळेल अशाप्रकारची अट दिलेली आहे. मागच्या वर्षी कोणतीही काम करणार कंपनी निविदा भरु शकत होती (रस्ते बनवणारी, बांधकाम करणारी इत्यादी सर्व कामे करणारी) मात्र यावर्षी केवळ एकाच कंत्राटदाराला नजरेसमोर ठेवून त्यालाच निविदा मिळेल अशाप्रकारची अट (Terms) ठेवण्यात आली आहे. ही अट अशी की, केवळ डिसटींग काम करणाऱ्या कंपनीला निविदा दिली जाईल. त्यात एकाच कंत्राटदाराच्या १) डी.बी. इंटरप्रायझेस, २) एन.एस. रनोजा डेव्हलपमेंट कार्पोरेशन, ३) त्रिदेव इन्फ्राप्रोजेक्ट, ४) तनिषा इंटरप्रायझेस यांनांच काम मिळेल अशाप्रकारची अट टाकून महानगरपालिका आणि सरकारचे नुकसान केले जात आहे.
0 टिप्पण्या