मुंबई महानगर पालिकेच्या बी विभागातील अनुज्ञापन खात्यात कार्यरत असणारे वरिष्ठ अनुज्ञापन निरीक्षक उमेश शांताराम तांबडे आणि शिपाई ज्ञानेश्वर विठ्ठल कवटे हे शुक्रवार ता. 28 रोजी महानगर पालिकेच्या सेवेतून नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांचा कार्यालयीन सहकारीवर्ग आणि उप अनुज्ञापन अधीक्षक शरद आयरे आणि वरिष्ठ निरीक्षक,अतिक्रमण निर्मूलन सूर्यकांत सावंत वरिष्ठ निरीक्षक सिताराम शेळके यांच्या हस्ते शॉल, श्रीफळ आणि गुलाब पुष्पगुच्छ देऊन हृदय सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित कार्यालयीन अनुज्ञापन निरीक्षक संजय बाक्कर,जॉन्सन दिब्रिटो, अजय वाळके,योगेश वैराळ आणि आवक जावक खात्याच्या मुख्य लिपिक सरिता मराठे यांच्यासह सहकारी वर्गाने हृद्य सत्कार केला.
यावेळी अनुज्ञापन उप अधीक्षक शरद आयरे यांनी या निवृत्त झालेल्या दोघां कर्मचाऱ्यांचा सन्मान,सत्कार प्रसंगी त्यांच्या पालिका सेवेतील केलेल्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करताना निवृत्तीनंतरचे आयुष्य निरोगी तसेच आनंदात राहावे अशा शुभेच्छा देताना तुम्ही या पुढे कुटुंब तसेच समाजा प्रति आपले जे काही कर्तव्य पार पाडणे राहिले असेल, काही स्वप्ने,इच्छा आकांक्षा पूर्ण करणे राहून गेले असेल ते या निवृत्त आयुष्यात पूर्ण कराव्यात.
ते पुढे म्हणाले कि, वरिष्ठ अनुज्ञापन निरीक्षक उमेश तांबडे यांनी मुंबई महानगर पालिकेत 33 तर शिपाई ज्ञानेश्वर कवटे यांची 36 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केली.तुमच्या निष्कलंक आणि प्रामाणिकपणे केलेल्या सेवेचा गौरव करताना आम्हाला आनंद होतोय. कोविड काळात कोणतेही आढेवेढे न घेता वरिष्ठ अधिकारी वर्गाने सोपविलेली विविध कामे अगदी प्रामाणिकपने पार पाडली असल्यामुळे यांच्या सारख्या सर्व कर्मचाऱ्यांमुळे मुंबई महानगर पालिके बद्दल नागरिकांच्या मनात असलेला पालिकेबद्दलचा विश्वास सार्थ ठरतो असे गौरवोदगार काढत दोघांचे कौतुक करीत त्यांना भावी आयुष्याकरिता शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या