सरकारला खरोखरच मातंग समाजाचा कळवळा असेल तर येत्या जून पर्यंत सरकारने आरक्षणाचे वर्गीकरण करून मातंग युवकांना जीवदान द्यावे अशी मागणी पाच मार्च रोजी आझाद मैदानावर निघणाऱ्या "मांगवीर महामोर्चा" द्वारे सरकारकडे करण्यात येणार असल्याचे दलित महासंघाचे डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी जाहीर केले. याबाबतची माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लाल सैना संघटनेचै कॉ. गणपते मिसे, बन्सीलाल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
अनुसूचित जाती आरक्षणात वर्गीकरण करावे आम्ही भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉग्रेसला मतदान करूत असा शब्द महायुतीत सहभागी असलेल्या वरील पक्षांना मातंग समाजाकडून दिला होता. समाजावर विश्वास ठेवून ना. एकनाथ शिंदे, ना. देवेंद्र फडणवीस, ना. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण करण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी 15 ऑक्टोबर 2024 रोजी शासन निर्णय पारित करून पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती नेमली. अभ्यास समितीला तीन महिन्याची काल मर्यादा दिली होती. दरम्याण विधान सभेच्या निवडणूका झाल्या मातंग समाजाने महायुतीच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले, महायुतीचे सरकार सत्तारूढ झाले. समाजाने आपला शब्द पाळला आहे म्हणून सरकारने देखील दिलेला शब्द पाळला पाहिजे. न्यायमुर्ती अनंत बद्दर समितीला दिलेली कालमर्यादा संपूण गेली आहे परंतु समितीने आद्याप सरकारला अहवाल सादर केला नाही. समितीचा अहवाल आला नाही अशी सबब सांगून सरकार वेळकाढूपणा करत आहे त्यामुळे दरदिवशी हजारो मातंग युवक 'एजबार' होत आहेत आणि शासकीय सेवा संधीला कायमस्वरूपी मुकत असल्याचा आरोप संकटे यांनी केला.सर्वोच्च न्यायालयाने 01 ऑगस्ट 2024 रोजी दि स्टेट ऑफ पंजाब विरूध्द दविंदरसिंग या निवाडयाद्वारे आरक्षण वर्गीकरणाचा अधिकार राज्याला दिलेला आहे. असं असतांना सरकार अत्यंत कासव गतीने निघालेले आहे त्यामुळे लाखों मातंग युवकांचे आयुष्य उध्वस्त होत आहे. उध्वस्त होणाऱ्या मातंग युवकांना वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मातंग संघटनाच्या सहभागातून "मांगवीरांचा महामोर्चा आझाद मैदानावर पाच मार्च रोजी धडकणार आहे. पाच मार्च हया दिवशी आरक्षण वर्गीकरणासाठी संजयभाऊ ताकतोडे शहीद झाले आहेत. म्हणूनच लाखों मातंगानी हजर राहून शहिदाला अभिवादन करून पुढील लढयाचे रणसिंग फुंकण्याचे अहवान यावेळी मांगवीरांना करण्यात आले.
लाल सैना, राष्ट्रीय लहुजी सेना, मांग गारूडी समाज संघ, जेष्ठ साहित्यीक. अण्णाभाऊ. साठे क्रांती आंदोलन, मातंग क्रांती मोर्चा, महाराष्ट्र, लहुजी सेना, लहुजी स्मारक समिती, मातंग क्रांती मोर्चा, लहु प्रहार संघटना, मातंग एकता आंदोलन, सकल मातंग समाज, मातंग युथ फेडरेशन, मातंग युवा जोडो अभियान, राष्ट्रीय लहुजी सेना, समस्त मातंग समाज, बहुजन जनता पक्ष, लहूजी महासंघ, बहूजन समता पार्टी, लहूजी परिवर्तन आघाडी
महाराष्ट्र मातंग एकता दल, लसाकम, लहूजी समता परिषद, दलित स्वयंसेवक संघ, बहूजन रक्षक दल, लहूजी संघर्ष सेना, जय हो मित्र मंडळ, लहू क्रांती संघर्ष सेना, मातंग समाज समन्वय समिती, अंबूज बटालियन इत्यादी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत
0 टिप्पण्या