जागतिक पातळीवर महिला दिनी भारतीय महापुरुष यांच्या विचारांना अनुसरून, समाजातील अनिष्ट रूढी परंपरा आणि धार्मिक बंधने, जीर्ण रूढी, परंपरा जुगारून, विधवा महिला यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यांना त्यांचं आयुष्य सन्मानाने जगता यावे, यासाठी त्यांना पुन्हा अलंकार प्रधान करून त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत म्हणून जागतिक पातळीवर महिला दिनी कोकणचे गाडगेबाबा मारुतीकाका जोशी त्यांचे सहकारी व प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशन तसेच प्रज्ञा प्रतिष्ठान यांच्या वतीने हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आपण व आपल्या सहकारी भगिनी याना प्रेरित करून पुन्हा अलंकार प्रधान करून त्यांना सन्मानाचे जीवन जगण्यास मदत करू असे कुशल काम आपल्या हातून घडेल अशी अपेक्षा व्यक्त करीत आपल्या संपर्कात असलेल्या आपल्या भगिनींना सोबत घेऊन शनिवार दिनांक 8 मार्च रोजी, सकाळी १० वाजता, मुंबई परळ येथील कुणबी भवन येथे होणाऱ्या सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रणाली सेवाभावी महिला असोसिएशनच्या अध्यक्षा गौतमी जाधव यांनी केले आहे.
0 टिप्पण्या