समता फेलोशिप च्या माध्यमातून महाराष्ट्र आणि राजस्थान दोन राज्यात संविधानिक मूल्यांवर प्रचार-प्रचार आणि त्यांची रुजवणूक करण्याचे कार्य सुरू असून निवडक फेलोच्या गोष्टी आपणसोबत शेयर करत आहोत संविधांनाची मूल्य खान्या अधनि जनमानसात पोहचवले आहे. 2022 ते 2024 था कालावधी मध्ये एकूण 38 फेलोज ने महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी काम केले असून आपल्या सोबत काही निवडक फेलोचे कार्य सुरू करत आहोत. यात या तीन वर्षात वेगवेगळ्या विषयावर काम करणारे फेलो आहेत ज्यात अगदी तळातून पुढे आलेले लोक ज्यात आदिम जन जाती, भटके विमुक्त, वारकरी संप्रदाय, शाहीर, अल्पसंख्यक, लेखक अश्या वेगवगेल्या मुद्याला हातळण्याचे काम या तीन वर्षात झाले ज्यात संविधानाची मूल्ये जपणे, ती रुजवणे व त्यातून मूल्यं आधारित नेतृत्व तयार करण्याचे काम केले आहे.
मनीष देशपांडे - माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी समता फेलोशिप च्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळून यंत्रणेला जबाबदार करण्याचे काम केले उदा; बार्शी नगर परिषदेची सर्वसाधारण सभेचे कामकाज सामान्य लोकाना समजावे म्हणून नगर परिषदे सोबत पाठपुरावा करून सर्वसाधारण सभा फेसबुक लाईव्ह करायला भाग पाडले आणि त्याचे नियमिती करण केले महाराष्ट्रातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतीमधील सर्वसाधारण सभा व्हिडिओ करून प्रसिद्ध करण्याचे व एकमेव बार्शी नगरपरिषद फेसबुक लाईव्ह करून अंमलबजावणी करणारी नगरपरिषद आहे असे म्हणता येईल.
गंगाताई जावरकर - कोरकू आदिवासी समूहातून आलेली महिला जी तीन वेळा सरपंच झालेली आहे त्यांनी कोरकू भाषेत संविधानाची प्रस्तावना करून लोकाकडे घेऊन गेली व आदिवासी भागात संविधान सांस्कृतिक केंद्र गावातील मुली / मुलांसाठी सुरू केले. तसेच गावातील लोकांच्या प्रश्नाला घेऊन त्याला संविधानाच्या कक्षतेत बसून लोक सहभागाने सोडवण्याचा प्रयत्न केला.
प्रियपाल गायकवाड आणि गट थियटर ऑफ ऑपरेस च्या माध्यमातून विविध कला प्रस्तुत केल्या ज्यात समता फेलोशिपमध्ये सहभागी झाल्यावर संविधानिक मूल्यांवर ४० विद्यार्थ्यांचा एक गट स्थापन केला६० युवकांसाठी चार फोरम थिएटर कार्यशाळा आयोजित केल्या, ज्याद्वारे संविधानिक मूल्यांचा प्रसार करण्यात आला आणि सहभागी विद्यार्थिना स्वातंत्र्य, समता, बंधुता हि मूल्य आणि थिएटर यांचा एकमेकांशी असलेला संबंध सांगण्यात आला, 'प्रथम पुरुष' या निर्मिती करून महाराष्ट्र साहित्य अकॅडमीकडून ५० प्रयोग करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळवले. 'डाई अक्षर प्रेम के यात्रा' मध्ये सहभाग घेतला आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार आणि रुजवणूक केली. 'कल्चर ऑफ डेमॉक्रसी' नावाचा एक गट स्थापन केला, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित 'दास्तान-ए-दस्तूर' हे नाटक लिहित आहे. फोरम थिएटरवर आधारित एक मॉड्यूल विकसित करत असून, डारिओ लुइगी अँजेलो एफ. यांच्या प्रेरणेतून जोडप्यांच्या नातेसंबंधांवर आधारित एक नाटक लिहित आहे.
विसस्मिल्ला सय्यद - जालना जिल्ह्यातील दहा पेक्षा जास्त गावांमध्ये युवक, महिला, पुरुष, मौलाना आणि इमाम यांच्यासोबत संविधानिक मूल्यांवर नियमित बैठका, चर्चा सत्रे आणि कार्यशाळा घेऊन समता, स्वातंत्र्य, बंधुता या मूल्यांचा प्रचार-प्रसार आणि रुजवणूक केली, समुदायातील लिंगभेदावर आधारित हिंसाचार आणि जातीय अत्याचाराच्या २५ प्रकरणांत हस्तक्षेप केला, कस्तुरबा गांधी कन्या विद्यालये आणि २३ पेक्षा जास्त शाळांमध्ये संविधानिक मूल्यांवर पंधरा सत्रे घेतली, ज्यामध्ये ७२० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले, जालना जिल्ह्यातील दहा गावांमधील पंधरा युवक गटांसोबत चर्चा संत्रे आणि बैठका घेतल्या आणि संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार आणि रुजवणूक केली गेली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (DLSA) सोबत संविधानिक मूल्यांवरील मोहिमांविषयी जागरूकता निर्माण केली, जालना येथे मुस्लिम समुदायासोबत 'दस्तूर बचाव तहरीक' या ७०विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित केली, ज्यामध्ये ७० जण सहभागी होते, जालना जिल्ह्यातील ५० शाळांमध्ये संविधानिक मूल्यांवरील ५० सत्रे घेतली, ज्याचा थेट परिणाम १,५०० विद्यार्थ्यांवर झाला, जालना येथे मुस्लिम समुदायातील १५ गटांसोचत २५ हून अधिक बैठका घेतल्या, ज्यामध्ये ३०० हून अधिक लोक सहभागी झाले, संविधान जागरूकता मंचातील विद्यार्थ्यांनी माझ्यासोबत गटांमध्ये काम करून संविधानिक मूल्यांबाबत जागरुकता निर्माण केली आणि या तत्त्वांची सखोल समज विकसित केली, जालना जिल्ह्यातील पाच शाळांमध्ये 'संविधान दालन' स्थापन करण्याचा पुढाकार घेतला,
एकल महिला संघटना: संविधानिक मूल्यांचा प्रचार-प्रसार करत असताना एकल महिला संपाने लातूर जिल्ह्यातील तळणी गावात दोन बालविवाह रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी पालकांशी संवाद साधून पालकाना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले, ज्यामुळे हे विवाह थांबले. सध्या दोन्ही मुली शिक्षण घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती १४ गावांमध्ये साजरी करून विविध जात आणि लिंग समुहांतील ३०० हून अधिक माहीला एकत्र आणले आणि आतभेद नष्ट करण्यासाठी काम करावे लागेल अशी शपथ घेतली, पतीच्या मृत्यूनंतर होत असलेल्या भेदभावपूर्ण प्रथेला आळा घातला. दुर्गम गावांमधील १०० हून अधिक महिलांना एकत्र करून बैठका, चर्चा आणि सत्रांच्या माध्यमातून संवैधानिक मूल्यांबद्दल जागरूकता निर्माण केली. लिंग समतेबद्दल जागृती निर्माण करून १०० हून अधिक एकल महिलांना कबड्डी स्पर्धेसाठी प्रवृत्त केले, मराठवाड्यातील बीड आणि नांदेड जिल्ह्यांतील वेगवेगळ्या गावांमध्ये एकल महिलांसाठी संवैधानिक मूल्यांवरील १० सत्रे आयोजित केली. 'हमारा आसमान' हा कार्यक्रम ३० महिलांसोबत राबवला जात आहे. ८ तालुक्यांमध्ये 'संविधान पंढरवाडा' चे आयोजन करून २००० हून अधिक लोकांपर्यंत पोहोचले. ३ व्यक्तींना कायदेशीर सल्ला दिला आणि १४६० लोकांना सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मदत केली.
संविधान साक्षर शाळाः शाळेत संविधान दालन सुरू केले, शिक्षकांचे नेटवर्क उभे राहिले, शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना संविधानिक मूल्यांवर चर्चा करण्यासाठी प्रत्येक तिसन्या शनिवारी सत्रे आयोजित केली जातात. शासन आणि शालेय व्यवस्थापन समित्यांसोबत सातत्याने काम सुरू आहे. जातीय सलोखा बाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या या कार्यक्रमात गावातील ८५ युवक सहभागी आहेत. 'संविधान साक्षरता संच' (Constitution Literacy Drive) राबवण्यासाठी तयारी सुरू आहे. चंदगडमधील ४८ शाळांसोबत टीम काम करत आहे.
0 टिप्पण्या