Top Post Ad

दुसरीकडे कामाला जातो म्हणून सावकार पटेलने बेदम मारले... मातंग व्यक्तीचा मृत्यू

मी रेशमा तानाजी सोनकांबळे, वय 30 वर्षे, व्यवसाय- गृहीणी, रा. नाईक चौक, शिवशक्ती नगर देगलूर रोड उदगीर, जि. लातूर नो नं. 9049627429 जात हिंदु-मातंग समक्ष हजर राहुन फिर्यादी जबाब लिहुन देते की, मी वर नमुद पत्यावर माझे पती नामे तानाजी बाबुराव सोनकांबळे वय-40 वर्षे, सासु सासरे, एक मुलगा नामे प्रशांत व मुलगी नामे प्रिया तसेच भाचा नामे अजय रामदास गायकवाड वय 30 वर्षे असे राहण्यास असून मी घरीच असते तसंच माझे पती मिळेल तेथे सेंट्रींगचे काम करून त्यावर आमचा उदरनिर्वाह चालतो.

मागील एक महीन्यापासुन माझे पती हे उदगीर येथील त्यांचे ओळखीचे गुत्तेदार नामे मेहराज पटेल रा. समता नगर, उदगीर यांचेकडे सेंट्रीगचे कामासाठी त्यांचे सोबत उदगीर व लातुर शहर येथे जात होते. आम्ही मातंग समाजाचे आहोत हे मेहराज पटेल यास माहित होते. मेहराज पटेल हे माझे पतीचे कामाचे पैसे देत नसल्यामुळे माझे पतीने त्यांचेकडे काम करण्यासाठी जाण्याचे बंद केले होते. त्यामुळे मेहराज पटेल हे दि. 04/03/2025 रोजी सकाळी 10/00 वा चे सुमा. आमचे घरी आले व त्यांनी माझे पतीस तु माझेकडे कामाला का येत नाही तु दुसरीकडे कामास का जात आहे असे म्हणून गोधळ घालु लागला व शिवीगाळ करू लागला. त्यावेळी माझे पतीने त्याना तुम्ही माझ्या कामाचे पैसे देत नाहीत त्यामुळे मी तुमच्याकडे कामास येत नाही असे म्हणून तुम्ही येथे गोंधळ घालु नका भी उदयापासुन तुमच्याकडे कामास येतो, तुम्ही मला कामाचे पैसे वेळेवर द्या असे म्हणाले, त्यानंतर मेहराज पटेल ये तुला बघुन घेतो असे म्हणून तेथुन निघुन गेले. 

दि. 05/03/2025 रोजी सकाळी 10/00 या चे सुमा, माझे पती मला म्हणाले की मेहराज पटेल मला कामाचे पैसे देणार आहेत त्यामुळे मी व भाचा अजय असे लातुर येथे त्यांनी सांगितलेल्या कामाचे ठिकाणी जात आहोत असे म्हणून घरातुन निघुन गेले. त्यानंतर सायं. 04/30 वा चे सुमा, माझे पती घरी आले. त्यावेळी ते लंगडत असल्यामुळे तसेच त्यांनी मला त्यांचे अग दुखत असल्याचे सांगितल्याने मी त्यांना विचारले असता मला मेहराज पटेलने कामासाठी लातूर येथे मला व भाच्याला घेवुन गेले व काम करून घेतले परंतु त्याने मला तु ड्याच हाताने दुसरीकडे कामासाठी जातो का असे म्हणून मला हातावर, पायावर, पाठीवर व छातीवर लाकडी दांड्याने जबर मारहाण केली तसेच अजयलाही हाताने मारहाण केली. त्यावेळी अजय हा तेथून पळून गेला आहे. त्यावेळी मी त्यांना आम्ही दुसरीकडे कामास जाणार नाही तुमच्याकडेच काम क डिग्री असे म्हणालो तरीही त्यांनी मला मारहाण केली आहे. तसेच त्यांनी मला तु केस केली तर तुला जिवंत सोडणार नाही तसेच तुझ्यासोबत कोणी आला तर मी व्यालाही सोडणार नाही अशी धमकी दिली. असे सांगितले. 

त्यांनतर माझे पतींनी घरीच आराम केला. त्यानंतर दि. 06/03/2025 रोजी पहाटे माझे पती यांना त्रास होऊ लागल्याने ते मोठमोठ्याने ओरडु लागले. त्यामुळे सकाळी अंदाजे 08/00 वा चे सुमा, मी, सासु व नणंद नाने रेखा असे माझे पतीला सरकारी दवाखाना उदगीर येथे उपचारकामी घेवुन गेलो, तेथे डॉक्टरांनी त्याना तपासले व आम्हाला सांगितले की, त्यांची तब्येत गंभीर आहे तुम्ही पुढील उपचारकामी लातुर येथे लवकर घेवुन जावा. त्यामुळे आम्ही सरकारी दवाखान्याची अ०म्बुलन्स ने पर्तीसोबत मी व सासु असे सरकारी दवाखाना लातूर येथे आलो. तेथे पतीवर आयसीयु मध्ये उपचार चालु झाले. त्यानंतर दि. 07/03/2025 रोजी उपचारा दरम्यान माझे पतीची तब्येत आणखी खालावली व सायं 04/30 वा चे सुमा. डॉक्टरांनी आम्हास सांगितले की, माझे पती मयत झाले आहेत. 

आज रोजी सकाळी माझा भाचा अजय हा देखील सरकारी दवाखाना लातूर येथे आला त्यावेळी त्याने मला सांगितले की, दि. 05/03/2025 रोजी सकाळी मेहराज पटेल यांचेकडे मी व मामा तानाजी असे कामास लातुर येथे गेलो होतो. परंतु दुपारी 12/30 वा चे सुमा. नूरानी कालनी बागारेड्डी कॉलनी जवळ सारोळा रोड लातुर येथील कामावर आम्ही काम करत असताना मेहराज पटेल, खलील ताणेदार व गौस असे तिघे तेथे होते. त्यांनी आम्हाला तुम्ही दुसरीकडे कामास जाता काय लय माजलास का असे म्हणून मला खलील याने हाताने गालावर चापटा मारल्या त्यावेळी मेहराज पटेल याने गौस यास लाकडी दांडा घेवुन वे असे म्हणाला व पौस हा लाकडी दांडा घेवुन येत असताना मामा तानाजी यास शिवीगाळ क डिग्री लागला. त्यावेळी मेहराज पटेल लाकडी दांड्याने व इतर दोघेजण लाथाबुक्यांने मामाला मारहाण करू लागल्याने ते लोक मला आणखीण मारतील म्हणुन मी तेथुन पळुन आलो असे म्हणाला. 

तरी दि. 05/03/2025 रोजी दुपारी 12/30 वा चे सुमा, नुरानी कालनी बागारेडडी कॉलनी जवळ सारोळा रोड लातुर येथे माझे पती नामे तानाजी बाबुराव सोनकांबळे यय-40 वर्षे यांना उदगीर येथील ओळखीचे गुतेदार नामे मेहराज पटेल रा. समता नगर, उदगीर याने व त्याचे सोबत खलील ठाणेदार व गौस यांनी तु दुसरीकडे कामाला का जातों काय असे म्हणून भाचा अजय यास हाताने चापटाने मारहाण केली व पत्तीचे हातावर, पायावर, पाठीवर व छातीवर लाकडी दाड्याने व लाथाबुक्यांने जिवे मारण्याचे उद्देशाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केल्याने उपचारा दरम्यान पती मयत झाले आहेत. म्हणुन माझी त्यांचेविरुध्द तक्रार आहे माझा जबाब मला माझे पतीचे मामाचा मुलगा नामे रवि अच्युत कदम वय 34 वर्षे रा जानवळ ता चाकुर जि लातूर यांनी वाचुन दाखविला तो माझे सांगण्याप्रमाणे बरोबर व खरा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com