बोधगया महाबोधी महाविहार मुक्त करावे. महाबोधी महाविहार कायदा बी. टी. अॅक्ट १९४९ रद्द करावा आणि बोधगया येथील महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे. या मागणीकरिता भिक्खू संघ मागील महिन्यापासून आंदोलन करीत आहेत. परंतु अद्याप पर्यंत बिहार सरकार किंवा केंद्र सरकार कुठलाही निर्णय घेण्यास अथवा हस्तक्षेप करण्यास तयार नाहीत. उलट आंदोलन करताय भिकू संघाला नाहक त्रास देण्यात येत आहे धरणे आंदोलन करण्याच्या ठिकाणी पाणी बंद करण्यात आले आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्रातून ठिकठिकाणी उठाव होत आहे. या देशात भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्माना धर्म स्वातंत्र्य असताना बौद्धांच्या बाबतीत वेगळा न्याय का ?
या देशात हिंदूंचे मंदिर हिंदूंच्या ताब्यात, ख्रिश्चनांचे चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात, मुस्लिमांच्या मशिदी मुसलमानांच्या ताब्यात, शिखांचे गुरुद्वारे शिखांच्या ताब्यात मग महाबोधी महाविहार है बौद्धांच्या ताब्यात का नाही ? त्यामुळेच याचा जाब बिहार सरकार आणि केंद्र सरकारला विचारण्यासाठी वाशीनाका परिसरातील विविध संस्था संघटना तसेच सामाजिक राजकीय धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणारे अनुयायी यांच्यासह समस्त बौद्ध समाजाच्या वतीने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्याकरिता भव्य शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २९ मार्च २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता वैशाली बुध्द विहार, म्हाडा कॉलनी, वाशीनाका ते माता रमाई चौक, आशिष थिएटर पर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे. तरी सामाजिक बांधिलकी जपत बौद्ध अनुयायी म्हणून बौद्ध वारसा जतन करण्याकरिता मोठ्या संख्येने शांतता रॅली मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन सकल बौध्द समाज समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
शांतता रॅली मध्ये सहभागी होताना सर्वांनी शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी व्हावे. शांतता रॅलीच्या अग्रभागी आदरणीय भंतेजी असतील. त्यांच्या मागे बौध्दाचार्य, बालक व महिला भगिनी, उपासक व कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते असा क्रम राहणार आहे याचे सर्वांनी तंतोतंत पालन करावे. शांतता रॅलीमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीने शांतता रॅली संपल्याचे जाहीर झाल्याशिवाय जाऊ नये. शांतता रॅलीमध्ये बौद्धांच्या परंपरेला साजेस आपल्या सर्वांचं वर्तन असावे. शांतता रॅलीमध्ये आपल्यासह परिचितांना सहभागी करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. शांतता रॅलीमध्ये सहभागी झालेल्या वाहनधारकांनी आपली वाहने योग्य त्या ठिकाणी पार्किंग करावी. शांतता रॅलीमध्ये पंचशील धम्म ध्वज व अशोक चक्रांकित निळा ध्वज यांचाच उपयोग करण्यात येईल याशिवाय अन्य ध्वजांचा वापर करू नये. समन्वय समितीकडून येणाऱ्या सूचनांचे संपूर्णपणे पालन करण्याची जबाबदारी प्रत्येक सहभागी झालेल्यांची राहील.
...............................................
*चलो बुद्धगया* *चलो बुध्दागया*
✊"*महाबोधी महाविहार मुक्त आंदोलन* "✊
*****************************
*मै आकाश लामा* :
बुद्ध गया का महाबोधी महाविहार *ब्राह्मणो के चुंगूल से* स्वतंत्र करने के लिए निकल पडो बौद्ध गया के लिए / आनेवाले *प्रियदर्शी सम्राट अशोक के* जयंती के अवसर पर तारीख 3 एप्रिल 2025 को बुद्धगया मे लाखों की संख्या मे जाना है/ बिहार सरकार को और विषमतावादी मनुवादी बहिरे सरकार को आगाज पोहोचाणे के लिये बडे संख्या की जरूरत है / बुद्ध धम्म संघ के भाषा मे इसे ही "लोकशाही" कहते है / "जितनी संख्या होगी भारी उतनीही जीत होगी हमारी"/ बुद्ध के धम्म को अनुसरते हो तो मानवता मे समता रखने के लिए, हमे *महाबोधी महाविहार को विषमतावादी अन्यायी कपटी लोभी *मनुवादी ब्राह्मणो के कब्जे से आजाद कराना होगा*/ आप हम सब की जिंदगी मानवता के लिए काम आये / *इसीलिए सभी बांधवो को निवेदन है चलो बुद्धगया / अभी नही तो कभी नही* / सब लोग बौद्ध गया आये तो न्याय जरूर मिलेगा /
*एक और लढाई आजादी की*
# भंते जी के आवाहन को ध्यान में रखते हुए *नागसेन टूर्स लेजारहा है 1 ते 6 अप्रैल 2025 सिर्फ़ और सिर्फ 5000/-* रहने की व्यवस्था होटल या गेस्ट हाउस में, सवेरे शाम खाना , नाश्ता , दो बार चाय
नोट : *ये टूर कमर्शियल ना होते हुए आंदोलन में शामिल होने के लिए है अगर आप को 5000/- रुपए ज्यादा लग रहे हो तो आप ट्रेन सेभी जा सकते है लेकिन आंदोलन में जरूर शामिल हो*
संपर्क : नागसेन बंसोड ... 8208109465
0 टिप्पण्या