Top Post Ad

बौध्द धम्माला बदनाम करण्याच्या हेतुने बिहार सरकारची वाटचाल - डॉ. नितीन राऊत*

महाबोधी महाविहाराचा ताबा बौध्द समाजाला सोपविण्याची विनंती केंद्र शासनाला करावी; विधानसभेत राज्य शासनाला केली मागणी

बिहार येथील बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावे, यासाठी शांततेच्या मार्गाने महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सुरू आहे. राज्य शासनाने हस्तक्षेप करुन महाबोधी महाविहाराचा ताबा बौध्द समाजाला सोपविण्याचि विनंती केंद्र सरकारला करावी, या ठिकाणी इतर कर्मकांड करुन बौध्द धम्माला बदनाम करण्याच्या हेतुने बिहार सरकारची वाटचाल असल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांनी आज विधानसभेत केले.
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार म्हणजे भारतासह जगभरातील बौद्धांचे प्रमुख तीर्थक्षेत्र होय. या महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात नाही. ते बौद्धांच्याच ताब्यात असावे, यासाठी विविध बौद्ध संघटनांकडून आंदोलन केले जात आहे. अनेक बौद्ध विहारांमध्येही आंदोलन करून केंद्र सरकारला निवेदन पाठवण्यात आले असल्याचे यावेळी डॉ. राऊत म्हणालेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई १९९२ पासून आंदोलन करीत आहे. सध्या महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी अनेक सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहे. राज्यात बौध्द समाजाची लोकसंख्या आजच्या घडीला १ ते १.५ कोटीच्या घरात असून महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या १० ते १३ टक्के लोक हे बौध्द धर्माचे पालन करीत असल्याचे डॉ. राऊत यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना डॉ. राऊत म्हणालेत की, महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलन कोणतीही नविन मागणी करत नाही. जो जुना कायदा आहे त्याला रद्द करण्याची साधी सरळ मागणी. सर्व जुने कायदे मोडीत निघाले मग हाच कायदा का कायम ठेवण्यात येत आहे, असा प्रश्न देखील डॉ. राऊत यांनी उपस्थित केला. प्रत्येक प्रार्थनास्थळावर त्या त्या समाजाचे व्यवस्थापन असावे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. तोच अधिकार आज भिक्खू संघ आणि देशातील बौध्द बांधव मागत आहे. याबाबत संसदेला जाणिव करून देण्यात आले आहे. आज भिक्खू संघाला तळपत्या उन्हात आंदोलनाला बसावे लागले आहे.
बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह नागपूर, पुणे, औरंगाबाद व ईतर ठिकाणी मोर्चे निघत असून मोठया संख्येने बौद्ध समाज बौध्दगया येथील आंदोलनात सहभागी होत आहे. १६ मार्च ला नागपूरात महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नागपूर येथील भीम चौकातून लाखोंच्या संख्येने मोर्चा निघाला असल्याचा उल्लेख यावेळी डॉ. राऊत यांनी विधानसभेत केला. यावेळी भारतीय संविधानाच्या कलम २५ - २८ नुसार प्रत्येक धर्माला जातीला त्यांच्या पवित्रस्थानी पूजा-अर्चना करण्याचे अधिकार आहे. राज्य शासनाने हस्तक्षेप करुन महाबोधी महाविहाराचा ताबा बौध्द समाजाला सोपविण्याचि विनंती केंद्र सरकारला करण्याची मागणी यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी केली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com