तथागत बुद्धांचे ज्ञानस्थान आणि जगभरातील बौद्धांचे पवित्र स्थान असलेल्या महाबोधी महाविहार (बोधगया, बिहार) चे संपूर्ण नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देणे आणि बोधगया मंदिर कायदा (B.T. Act) 1949 रद्द करणे. याकरिता पाटणा येथे ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि समाजाच्या इतर अनेक संघटनांनी १७ सप्टेंबर पासून कायदेशीर लढाई सुरू केली आहे. या आंदोलनाच्या वाटचालीत, १२ फेब्रुवारीपासून महाबोधी महाविहारासमोर ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरमतर्फे बेमुदत उपोषण आंदोलन सुरू आहे आणि देशाच्या विविध भागांमध्ये समर्थन आंदोलन सुरू आहे. मात्र महाबोधी महाविहाराबाबत अद्याप कोणताही निर्णय शासन घेतांना दिसत नाही.
बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दलानेही BT ACT 1949 याला विरोध केला आहे. दिनांक २७ फेब्रुवारीच्या पत्रानुसार संपूर्ण देशात निषेध आंदोलन सुरु करण्यात आले आहे. या आंदोलनात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल आणि समाजातील इतर सर्व संघटनांनी मा. अध्यक्ष, मा. पंतप्रधान, मा. राज्यपाल आणि मा. मुख्यमंत्र्यांना (बिहार सरकार) बोधगया मंदिर कायदा (B.T. Act) 1949 रद्द करणेकरिता ई-मेल पाठवण्यास सुरुवात केली आहे. स्थानिक जिल्हा अधिकारी, पोलीस स्टेशन, तहसीलदार इत्यादींमार्फत मोठ्या प्रमाणात निवेदन संबंधितापर्यत पोहोचवणं गरजेचे आहे्.याच अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभेचे मुख्य सल्लागार व राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अँड. प्रकाश व बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शन व आवाहनानुसार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून १२ मार्च रोजी दुपारी 12 वाजता महाबोधी महाविहार, बोधगया मुक्तीसाठी सर्व जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर प्रथम सामूहिक महा बुद्धवंदना (त्रिशरण, पंचशील) होणार आहे. या आंदोलनात द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दलाच्या सर्व राज्य/प्रदेश, जिल्हा, तहसील आणि शहर शाखांचे अधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. असे भारतीय बौद्ध महासभा विश्वस्त/राष्ट्रीय कार्याध्यक्ष तसेच राष्ट्रीय अध्यक्ष, समता सैनिक दल डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी प्रसिद्धी पत्रकादरे कळवले आहे
0 टिप्पण्या