Top Post Ad

मराठी भाषेचा गौरव हा वर्षाचे 365 दिवस व्हायलाच हवा- मंत्री उदय सामंत

 मराठी ही आपली मातृभाषा आहे तिचा गौरव केवळ २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जयंती दिनीच होतो.जो  ३६५ दिवस व्हायलाच हवा, असे विचारधन महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार सन्मान सोहळ्यात काढले. शिवसेना दक्षिण मुंबईच्यावतीने विभागप्रमुख दिलीप नाईक यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्यानिमित्ताने आयोजित केलेल्या मुंबई महानगर पालिका पत्रकार सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत उदय सामंत यांनी पत्रकारांचा गौरव केला. त्यावेळी त्यांनी आपले विचार व्यक्त केले..   मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांच्यासह किरण पावसकर,  एकनाथ शेलार, सुनील नरसाळे, प्रमोद मांडेकर, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबई मराठी पत्रकार संघात मुंबई महानगरपालिकेत वार्तांकन करणाऱ्या तसेच सामाजिक प्रश्नावर वाचा फोडणाऱ्या आणि त्यासाठी प्रसंगी सरकारला धारेवर धरणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.पत्रकार दिनेश मराठे यांनी स्थानिक पातळीवर होत असलेल्या पालिकेच्या कारभाराबाबत केलेल्या बातम्यांची दखल घेऊन त्यांचाहि यावेळी सन्मान करण्यात आला.


मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, राज्य मंत्रिमंडळात सध्या महसूल खाते, उद्योग खाते तसेच नगरविकास खात्यांचे मंत्री होण्यासाठी मोठी चढाओढ असली तरी पुढील पाच वर्षांत मराठी भाषा मंत्री होण्यासाठी चढाओढ असेल असा विश्वासहि व्यक्त केला.सध्या या खात्याच्या वतीने १७ देशांशी आमचा कारभार जोडला गेला असला तरी भविष्यात ५० देशांशी या खात्याचा कारभार जोडला जाईल  शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी ४० लाख झोपडपट्टीतील लोकांचे जीवनमान सुधारावे म्हणून त्यांना मोफत घरे देण्याची घोषणा १९९५ साली केली होती. झोपडी वासियांना घरे देणारी हीच ती एसआरए योजना आहे. पण या झोपड्या वाढत गेल्या त्याला कारण ठरले ते आपलेच मराठी बांधव आहे असे म्हणत रेशनिंग ऑफिस, पोलिस आणि महानगर पालिका येथे काम करणारा मराठी माणूस अमराठीमाणसांना सहकार्यकरीत होता म्हणून मुंबईत झोपड्या वाढल्या आहेत. आपण मराठी भाषिक आहोत आणि आपल्यापासूनच आपल्या मराठी भाषेचे संवर्धन केले पाहिजे.मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा राज्य सरकारने पुरस्कार देऊन गौरव करावा अशीही सामंत यांनी यावेळी संकल्पना मांडली.प्रत्येकाने आपल्या मातृभाषेत मराठीत बोलले पाहिजे मग तुम्ही परदेशात असा किंवा मायदेशात असा यासाठी पत्रकारांनी जनजागृती केली पाहिजे असेही मंत्री उदय सामंत यांनी म्हटले.

यावेळी किरण पावसकर यांनी पत्रकार हा समाजमनाचा आरसा असून ज्या काही घटना समाजात घडतात त्याची सविस्तर बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी वृतपत्रात वाचताना हि माहिती अचूक मिळत असते. पत्रकारांनी निर्भीडपणे असत्यावर आसूड ओढत सत्य समाजासमोर आणले पाहिजे. सरकार,विरोधीपक्ष यांच्यापुढे नागरिकांचे प्रश्न मांडताना आपली लेखणी निर्भीडपणे चालवावी असे म्हणत पत्रकारांना त्यांच्या धाडसी पत्रकारीतेसाठी मनोबल वाढविण्या शुभेच्छा दिल्या.या पत्रकार सन्मान सोहळ्याचे सूत्रसंचालन सुदीप नाईक यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com