द्रौपदी मुर्मू यांचा अर्थात राष्ट्रपती महिलेचा अपमान केल्याचा आरोप करीत भाजपने सोनिया गांधी आणि पप्पु यादव यांना नोटीस दिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा सभापती जगदिप धनखड यांना याबाबत पत्र लिहिण्यात आले आहे
संसदेच्या आर्थिक अधिवेशनापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अभीभाषण केले, यावर सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्याबद्दल "त्या बेचाऱ्या बोलताना थकल्या" असे वक्तव्य केले, यावर भाजपा नेत्यांपासून भक्तांपर्यंत सर्वांनी गदारोळ करायला सुरवात केली आणि भाजपाच्या दलाल मीडियाने (वर्तमान पत्र व वृत्त वाहिन्या) हेच दाखवायला सुरवात केली. खरं सांगायचं तर माझ्यासह संपूर्ण भारत त्यांना अगोदरपासून बेचाऱ्या असेच मानतो, अगदी भाजपा मधील अनेक नेत्यांचे सुध्दा असेच म्हणणे आहे. आता ते कसं तर? संविधानानुसार राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च पद आहे, म्हणजेच एखाद्या राजासारखे! आणि प्रधानमंत्री पद हे सहाव्या स्थानावर येते. म्हणजेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा उपाध्यक्ष, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि त्यानंतर प्रधानमंत्री असे असतें.
असे असताना या राष्ट्रपती असणाऱ्या द्रौपदी मुर्मू यांना फक्त एक आदिवासी महिला म्हणून अनेक ठिकाणी डावललं गेलंय, त्यांना फक्त एखाद्या बाहुली सारखं सजावटीला बसवलंय, म्हणूनच त्या बिचाऱ्या आहेत. अगदी देशाच्या नविन संसद भवन इमारतीच्या उदघाटन प्रसंगी देशाच्या सर्वोच्च म्हणून त्यांचा मान प्रथम होता, त्यांच्या हस्ते उदघाटन होणे गरजेचे होते, परंतू त्या फक्त आदिवासी महिला आहेत म्हणून डावलून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संसद भवनाचे उदघाटन करतात. राजदंडावर अधिकार हा राष्ट्रपतीचा असतो, परंतू तो ही त्यांना नाकारला जातो. त्यांनतर राम मंदिराचा सोहळा पार पाडला जातो, भारत देशाचा कार्यक्रम असल्यासारखा तो सरकारी वाहिन्यावर म्हणजेच दूरदर्शन वर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाते, परंतू त्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फक्त आदिवासी महिला म्हणून साधे निमंत्रणही दिले जात नाही.
कालही संसदेच्या अधिवेशनापूर्वी झालेल्या भाषणात प्रत्येक वेळी त्या "मेरी सरकार" असेच म्हणत होत्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या लिहून दिलेले भाषण वाचत होत्या, हे स्पष्ट दिसत होते. निदान त्यांनी साधा सराव तरी अगोदर करायला हवा होता. तो ही केल्यासारखा वाटत नव्हता.
त्यातही म्हणताना त्या म्हणाल्या "मेरी सरकारने तिसरे टर्म मे भारत को विकास की ओर लाया है|"
मुळात त्या कोणत्या विकासाच्या गोष्टी करत होत्या? ते त्यांनाच माहिती नसावं!
1. ज्या संसद भवनात त्या काल बोलत होत्या ते संसद भवन पावसाळ्यात गळतं, याला हे विकास म्हणत होत्या का?
2. सरकारने बांधलेले शेकडो पुल पावसाळ्यात वाहून गेले त्याबद्दल बोलत होत्या का?
3. मोठा सोहळा करुन लोकांच्या भावनेशी खेळून बांधलेले राम मंदिर पावसाळ्यात गळते, ह्याला त्या विकास म्हणत होत्या का?
4. ज्या गौतम अडाणीला हे मोदी सरकार डोक्यावर बसवून नाचतंय, ज्याला भारतातील सगळ्यातं जास्त जमिनी आंदण म्हणून दिल्या गेल्या आहेत, त्या अडाणीची जगातील 5 देशात चौकशी सुरू आहे, याला त्या विकास म्हणतायेत का?
5. लोकशाहीचे चारही खांब धर्मांध शक्तीची गुलामी करतायेत, याला त्या विकास म्हणतायेत का ?
6. सर्वात शेवटी की या जातीवादी पुरुषप्रधान विचारसरणीच्या प्रधानमंत्रीद्वारे राष्ट्रपती स्वतः आदिवासी महिला आहेत म्हणून त्यांचा मान सन्मान नाकारला जातोय, याला त्या विकास म्हणतायेत का?
असो असे अनेक प्रश्न आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे स्वतःकडे नाहीत असले तरी त्यांना सर्व स्विकारल्यामुळे बोलता येत नाही. म्हणून बिचाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू!
प्रमोद शिंदे
प्रवक्ता, मुंबई प्रदेश संभाजी ब्रिगेड
0 टिप्पण्या