Top Post Ad

भारतात जातीय जनगणना झाली पाहिजे... राहूल गांधी

 


राहूल गांधीचे आजचे भाषण ..... पाऊण तासाच्या भाषणात अनेक मुद्द्यांवर भाष्य 

चीन आपल्याहून किमान १० वर्षं पुढं आहे. त्यांनी उत्पादन करण्यावर भर दिला आहे. 
भारतात चीनने ४०००चौरस किलोमीटर अतिक्रमण केले आहे.  'मेक इन इंडिया' निष्प्रभ ठरल्यानेच भारतात अतिक्रमण करण्याचे धाडस चीनने केले.
मोबाईल वर लिहून येतं कि 'मेड इन इंडिया' पण मुळात मोबाईल भारतात असेंबल केला जातो, जोडला जातो. पण जे काही तयार व्हायचं ते चीनमध्येच होतं. याचा फायदा चिनी युवकांना होतो. 
भारतात उत्पादक कमी आणि ग्राहक जादा आहेत. 
जग मोठ्या बदलाला सामोरे जात आहे. 
रशिया आणि युक्रेनमधील यूद्ध हे दोन देशांतील युद्ध नसून ड्रोन आणि टँकर (रणगाड्यातील) युद्ध आहे. 
इंजिनला किंवा टँकरला उद्ध्वस्त करायची क्षमता बॅटरी आणि इलेक्ट्रिकल मोटरमध्ये आहे. हे युद्ध त्यातील आहे. 
भारताने उत्पादकता वाढविण्यावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. 

भारतातील मोठी लोकसंख्या जेलमध्ये आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तैनात आहे. तिथे ही उर्जा खर्च होत आहे. 
भारतात सामाजिक तणाव वाढला आहे. जो उत्पादकता वाढविण्यावर परिणाम करतो. 
 AI  हे पुर्णपणे डाटा वर अवलंबून आहे. 
Google, facebook, instagram  या परकीय कंपन्या आहेत. आपल्या देशाकडे डाटाच नसेल तर AI क्षेत्रात आपण काय करणार? 
ही सगळी जगभर जी क्रांती घडत आहे ती युवक घडवत आहे. त्यांना यात पार्टनर करून घ्या. 
जर आपल्याकडे उत्पादन करण्याची क्षमता असती तर अमेरिकेचा अध्यक्ष आपल्याकडे येईल. ती सध्या नाही आहे म्हणून आपल्या परराष्ट्रमंत्र्याला तिकडं धाडून डोनाल्ड ट्रंपच्या शपथविधीला निमंत्रण मागावं लागत आहे. (यावर भाजपा खासदारांनी गोंधळ घातला)
भारत देशाचा अमेरिका हा सहकारी देश राहीला आहे. त्यांच्याबरोबरचे संबंध योग्यरित्या प्रस्थापित केले तर तर एकत्रित येऊन काही करता येईल.
भारतात जातीय जनगणना झाली पाहिजे. संपत्ती, सत्ता यावर कुठल्या जातींचा किती वाटा आहे हे कळायला हवं. 
राहूल गांधी शेवटी महाराष्ट्र विधानसभेचा विषय काढला. 
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान हिमाचल प्रदेश या राज्याची जितकी लोकसंख्या आहे तेवढे मतदार या दोन निवडणूकांच्या दरम्यान वाढले. 
सुमारे ७० लाख मतदार या दोन निवडणूकांदरम्यान लढले. पाच वर्षांत इतके मतदार वाढले नाहीत तितके पाच महिन्यांत वाढले. 
शिर्डीमध्ये एका इमारतीत ७,००० मतदारांची नोंद झाली आहे. 
निवडणूक आयोगाचा अध्यक्ष नेमण्यासाठी जी समिती नेमतात त्यातून सरन्यायाधीशाला वगळले आहे. 
महाराष्ट्रात लोकसभेला आणि विधानसभेला मतदान केलेल्या मतदारांची यादी आम्हाला द्या अशी मागणी आम्ही केली आहे. ते देणार नाहीत हे आम्हाला माहित आहे.
अमित शहा, मोदी आणि मी (राहूल) तिघे जण हा मुख्य निवडणूक आयुक्त निवडणार. खरंतर मोदी शहाच निवडणार मी फक्त हो म्हणायला जाणार का?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com