शिक्षणातून उन्नती :सन २०२४-२५ मधील संक्षिप्त सारांश
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीच्या एकूण ४७९ शालेय इमारती आहेत. मार्च २०२५ पर्यंत शाळांच्या दुरूस्ती, दर्जोत्रती, पुनर्बाधणी व नवीन बांधकामांची एकूण ४५ कामे पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित ३६ कामे आगामी आर्थिक वर्षामध्ये पूर्ण करण्यात येणार. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये शिक्षण खात्याच्या महसुली अर्थसंकल्पांतर्गत ३५४४.३४ कोटी व भांडवली अर्थसंकल्पांतर्गत ४११.३० कोटी इतकी एकूण तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
- सन २०२४-२५ मध्ये, CBSE मंडळाच्या ४ नवीन शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत, CBSE मंडळाच्या १८ आणि ICSE, IGCSE व IB मंडळाची प्रत्येकी १ अशा एकूण २१ शाळा सुरू आहेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील एकूण ७,९३४ वर्गखोल्यांपैकी ३,८१४ वर्गखोल्या डिजीटल करण्यात आल्या असून उर्वरीत ४,१२० वर्गखोल्या टप्प्याटप्याने डिजीटल करण्यात येणार आहेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये १२ प्रकारच्या अभ्यासक्रमांसह एकूण २२० कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आली असून शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करीता प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेले आहेत.
- शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलमार्फत निवड झालेल्या ६२२ पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत.
- अवकाशात घडणाऱ्या विविध खगोलीय घटनांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा निर्माण होऊन त्यांच्या खगोलीय ज्ञानाच्या कक्षा वृध्दींगत करण्याकरिता तसेच वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या वाढीकरिता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० अंतर्गत प्रायोगिक तत्वावर खगोलशास्त्रीय प्रयोगशाळा उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- प्राथमिक विभागाच्या २५ शाळांमध्ये नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्रांची उभारणी करण्याची कार्यवाही सुरू आहे.
- माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतील गुणानुक्रमे प्रथम १०० विद्यार्थ्यांकरिता तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या पाल्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेत ६०% किंवा त्याहून अधिक गुण प्राप्त केले असतील अशा गुणानुक्रमे प्रथम १०० पाल्यांकरिता आर्थिक सहाय्य योजना सुरू करण्यात आल्या आहेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता खुल्या व्यायामशाळा उभारण्यात आल्या आहेत.
- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहर विभागातील १०० शाळांमध्ये ऑरगॅनिक फार्मिंग (किचन गार्डन) ही संकल्पना राबविण्यात आली आहे.
- आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील नवीन प्रकल्प व कल्याणकारी योजना -
- Mission Vision 27 पुढील दोन वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आढावा घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना अधिकाधिक सक्षम बनविण्याची दूरदृष्टी ठेवून शिक्षकांना मार्गदर्शन करण्याकरिता दि. २३.१०.२०२४ रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह, जिजामाता उद्यान, भायखळा (पू) येथे "Mission Vision 27" कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
- Mission SAMPURN विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व क्षेत्रांचा विचार करून शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून 'Mission SAMPURN (School Infrastructure, Admission, Merit, Productivity, Universalisation, Responsibility, Nutrition and Health) राबविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
- विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) रोबोटिक्स - विद्यार्थ्यांमध्ये इतर कौशल्यांसोबतच विज्ञान आणि तंत्रज्ञानाबाबत सखोल रुची निर्माण करण्याकरिता आणि त्यांची विश्लेषण क्षमता व कल्पकता वृद्धींगत करण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी STEM रोबोटिक्स प्रयोगशाळा उभारण्याचे प्रस्तावित आहे.
- पूरक पोषण आहार विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील बालवाडी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनासह पूरक पोषण आहार देण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.
- विज्ञान पार्क बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २ शालेय इमारतींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर विज्ञान पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे.
- इंग्रजी भाषा प्रयोगशाळा शालेय इमारतींमध्ये सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या संगणक प्रयोगशाळा, ई-वाचनालय व शैक्षणिक टॅब इ. सुविधांसोबतब एक नवीन स्वतंत्र इंग्रजी भाषा प्रयोगशाळा उभारण्याचेदेखील प्रस्तावित आहे.
- सायबर साक्षरता शैक्षणिक विकासासाठी इंटरनेटचा वापर करताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी हे विद्यार्थ्यांना समजण्याकरिता आणि वैयक्तिक, शैक्षणिक व व्यवसायिक कामकाजात इंटरनेटचा वापर करताना होणारी ऑनलाईन फसवणूक टाळण्याकरिता सायबर साक्षरता हा प्रकल्प राबविण्याचे देखील प्रस्तावित आहे.
- जादुई पेटारा (ज्ञानपेटी) विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला व कल्पकतेला वाव देऊन त्यांना आनंददायी शिक्षण मिळावे या करीता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० अंतर्गत जादुई पेटारा (ज्ञानपेटी) ही संकल्पना राबविण्यात येणार आहे.
- बोलक्या भिंती - शालेय इमारतींच्या संरक्षक भिंतींवर आतल्या बाजूस शैक्षणिक, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारी चित्रे चित्रित करण्यात येणार आहेत. त्याद्वारे, शालेय अभ्यासक्रमातील एखादी संकल्पना स्पष्ट करत असताना सदर आशयाचे चित्र दाखविले असता विद्यार्थ्यांना ती संकल्पना लवकर समजण्यास मदत होईल.
0 टिप्पण्या