मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर यांसह राज्यभरातील अनेक जिल्ह्यात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. यातून राज्याच्या सुरक्षेला मोठा गंभीर धोका निर्माण झाला असून सामाजिक अस्थिरता, गुन्हेगारीत वाढ, रोजगाराची समस्या यांमुळे येथील स्थानिक जनता त्रासलेली आहे. खोट्या कागदपत्रांवर वास्तव्य करणाऱ्यांचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची पश्चिम बंगाल, 'आसाम सारखी स्थिती होण्याआधी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात 'बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम' राबवून सर्व बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना देशाबाहेर हाकलावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर यांनी केली. ते मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आज ३ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक, मुंबई उच्च न्यायालयाचे अधिववत्ता राहुल पाटकर उपस्थित होते'
. सभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये एक लाखाहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटप करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी घुसून हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली. तो बनावट नावाने मुंबईत वास्तव्य करत होता. रत्नागिरीतील चिपळूण १३ बांगलादेशी नागरिकांपैकी ३ जणांनाच अटक करण्यात आली; त्यातही पोलिसांनी हे प्रकरण नीट न हाताळल्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना जामीन मिळाला, ही अतिशय गंभीर बाब आहे. देशाची न्यायव्यवस्था बांगलादेशी घुसखोरांना जामीन देते, ही न्यायदेवतेची थट्टा आहे. असे मत कोचरेकर यांनी व्यक्त केले.सनातन संस्थेचे प्रवक्ता अभय वर्तक म्हणाले, 'नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड आदी शहरी भागांमध्येही शेकडो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना अटक झाली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १८ हजारांहून अधिक बेकायदेशीर घुसखोर राहत असल्याचा अंदाज आहे. अशीच स्थिती राज्यभरात आहे. खरेतर ही आकडेवारी म्हणजे हिमनगाचे टोक आहे. बांगलादेशी घुसखोर ही समस्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून याची पाळेमुळे खणून काढणे अत्यावश्यक आहे. राज्यात 'बांगलादेशी घुसखोर शोध मोहिम राबवावी; या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्हे, शहरे, तालुके येथील संशयित ठिकाणी 'सर्च ऑपरेशन' 'कॉम्बींग ऑपरेशन' राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे, बनावट ओळखपत्रे तयार करणाऱ्या रॅकेटची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी; भाड्याने खोली देण्याआधी घरमालकाने भाडेकरूंची, तसेच कामावर ठेवतांना कामगारांची योग्य ती चौकशी करावी, संशयास्पद आढळल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे. घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे साहा करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी असल्याचे वर्तक म्हणाले
.सध्या बांगलादेशात अल्पसंख्यांक हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत आहेत. उद्या हे बांगलादेशी घुसखोर वाढत जाऊन भारतात छोटे बांगलादेश निर्माण करून तेथील हिंदूंवर असे अत्याचार करतील, ही परिस्थिती येऊ द्यायची नसेल, तर या प्रकरणी सरकारने आताच कठोर पावले उचलायला हवीत. या दृष्टिने जनजागृतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने, मोर्चे, स्वाक्षरी अभियान, पोलिस तक्रारी दाखल करणे असे नियोजन सुद्धा करणार असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता सतीश कोचरेकर म्हणाले.
बांगलादेशी लोकांचा आपल्या बाजारपेठेवर प्रचंड परिणाम होत आहे. अगदी स्वस्तात स्वस्त माल विकून हे लोक इथली बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र एवढा स्वस्त माल विकण्यास कसे परवडते असे विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले असल्याचे राहूल पाटकर यांनी सांगितले. त्यामुळे येणाऱ्या काळात महाराष्ट्र सह देशाची आर्थिक व्यवस्था बिघडल्यास त्याला कारणीभूत बांगलादेशीच असतील. तेव्हा यांना आत्ताच आळा घालणे गरजेचे आहे. त्यासाठीच ही जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली असून यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन पाटकर यांनी केले
0 टिप्पण्या