कान्सचं बिगुल वाजलं!...78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म मार्केटमध्ये मराठी चित्रपटाना सहभागी होण्याची सुवर्ण संधी १८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
फ्रान्स येथे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने 78 व्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या फिल्म बाजार-2025 मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका मागविण्याची घोषणा केली आहे. 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांना यासाठी प्रवेशिका सादर करता येणार असून या प्रवेशिका अर्ज filmcitymumbai.org संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी जास्तीत जास्त निर्मात्यांनी प्रवेशिका अर्ज भरण्याचे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले आहे.मराठी चित्रपटांना जागतिक चित्रपट बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी २०१६ पासून महामंडळ कान महोत्सवात सहभागी होत आहेत. यंदाही सहभागी होण्यासाठी निर्मात्यांनी 18 फेब्रुवारी पर्यंत दिलेला अर्ज भरून cfffm2025@gmail.com या मेल आयडीवर मेल करायचा आहे. अधिक माहिती आणि नियम www.filmcitymumbai.org या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कान्स आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 फिल्म बाजारमध्ये सहभागी होण्यासाठी 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सेन्सॉर प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या मराठी चित्रपटांना सहभागी होता येईल.- निर्माते / निर्मिती संस्थांनी त्यांचे अर्ज cftim2025@gmail.com या ई-मेल वर सादर करावेत.- इतर भाषेतील रिमेक, डब असलेल्या मराठी चित्रपटांना सहभागी होता येणार नाही.- ज्या चित्रपटांची गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव फिल्म बाजार 2024 करिता महामंडळामार्फत निवड करण्यात आली होती अशा चित्रपटांना सहभागी होता येणार नाहीं
0 टिप्पण्या