संघर्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचा प्रथम वर्धापनदिन मोठ्या उत्साहात दि. ९ जानेवारी रोजी दिघा, नवी मुंबई या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी कर्मवीर एकनाथरावजी आवाड समाज भुषण पुरस्काराने अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मानवी हक्क अभियान मराठवाडा अध्यक्ष मच्छिंद्र गवाले यांनी केले तर अध्यक्षस्थानी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष काळे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलैस भिसे यांनी केले. प्राध्यापक आर डी जोगदंड, श्रीकांत शिंदे, डॉ. मच्छिंद्र गवाळे (मानवी हक्क अभियान) डॉ. मधुकर गायकवाड, राजाबाई सूर्यवंशी (मास संघटना राष्ट्रीय अध्यक्ष) अंतेश गवळी (इंटरनॅशनल स्कूल खारघर) डॉ. एच आर गुप्ता, यशवंत फडतरे (मानवी हक्क अभियान जेष्ठ कार्यकर्ते) कल्याण ताकतोडे (मानवी हक्क अभियान) आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी रिपब्लिकन चळवळीतील जेष्ठ नेते रमेश भांगे, सामाजिक कार्यकर्ते अॅड. कैलास हावळे, इको फ्रेंडली लाईफ महाराष्ट्र समन्वयक किशोर बनकर, मानवी हक्क अभियानच्या राधिकाताई चिंचोळ, संघमित्राताई गवळी तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू शेट्टी, वैशाली भोसले आदी मान्यवरांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संजय आढांळगे आणि इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या