Top Post Ad

दहिसर येथील विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात आजी आजोबा कृतज्ञता दिन उपक्रम संपन्न

दहिसर येथील विद्या मंदिर शाळेच्या भाई सुर्वे सभागृहात शनिवार दिनांक ११ जानेवारी  रोजी  आजी आजोबा कृतज्ञता दिन  उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  यासाठी उपक्रमाच्या उत्सवमूर्ती म्हणजेच आमचे लाडके आजी आजोबा, उपक्रमाचे प्रमुख पाहुणे  सुनिल कदम, संचालक समिती सदस्या आणि सन्माननीय मान्यवर बालोद्यान शालेय समिती अध्यक्षा  प्रिया निकम, संचालक समिती आणि बालोद्यान शालेय समिती सदस्य  नरेंद्र तरे, शाळेचे मुख्याध्यापक  सुधीर देसाई, बालोद्यान मुख्याध्यापिका  निधी गोडांबे उपस्थित होत्या .

     शाळेत येणा-या आपल्या नातवंडांची शाळा कशी आहे याबाबत आजी आजोबांना खूप उत्सुकता असते. आजी आजोबांची ही उत्सुकता जाणून आणि आजी आजोबांना त्यांच्या बालपणात रममाण होता व्हावे या दुहेरी हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उपक्रमाच्या सुरवातीलाच सुनिल कदम सरांनी आपल्या वाक् चातुर्याने सर्वांची मनं जिंकून घेतली. आजी आजोबांना विविध खेळ खेळायला लावून, बक्षीस म्हणून चाॅकलेट देऊन त्यांना बालपणातील आठवणींत रममाण केले. खेळांद्वारेच  कदम सरांनी आजी आजोबांना आयुष्यात येणा-या अडचणींचा सामना कसा करायचा याचा नकळत संदेश दिला. आयुष्याची सेकंड इनिंग कशी आनंदमयी होईल याबाबत आजी आजोबांना काही टिप्स दिल्या.         उपक्रमाच्या शेवटी आजी-आजोबांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरत मनमुराद आनंद लुटला. तर दोन आजी आजोबांनी उपक्रमाबाबतचे मत व्यक्त केले.  उपक्रमाची आठवण म्हणून    आजी आजोबा, उपस्थित मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांचे ग्रुप फोटो काढण्यात आले.   सर्व आजी आजोबांनी या उपक्रमाचा भरभरून आस्वाद घेतला.

          उपक्रमाचे प्रमुख पाहुणे  सुनिल कदम मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पर्यावरण विषयक आणि निसर्ग सान्निध्याची आवड असल्याने आपल्या सर्वांना भीती वाटणा-या सापांना पकडण्याचे जोखीमयुक्त कार्य ते २५ वर्षापासून करत आहेत. तसेच सापांवर संशोधन करणा-या हाफकिन्स या संस्थेला ते विषारी साप देऊन सहकार्य करतात. लोकांच्या मनात असणा-या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विज्ञान संघटना, मराठी विज्ञान परिषद या संस्थेत कार्यरत आहेत.   


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com