मुंबईतील दहिसर (पूर्व) येथील जनकल्याण दहिसर संस्थेच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्याना याबाबत वारंवार माहिती देऊनही अधिकारी वर्ग याकडे अर्थपूर्ण कानाडोळा करीत आहे. यामुळे शेकडो गोरगरीब जनतेला आपल्या हक्काच्या घरापासून वंचित रहावे लागत आहे. हा भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी संबंधित परिसरात बॅनरद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र याकडेही संबंधित अधिकाऱ्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. या सर्व प्रकरणाची शासनाने दखल घेऊन तात्काळ चौकशी करावी. तसेच दोषींवर कारवाई करावी यासाठी आपण येत्या २७ जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषण आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पवार यांनी जाहिर केले. या सर्व प्रकरणाची प्रसिद्धी माध्यमांना माहिती देण्याबाबत आज मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या भ्रष्टाचारात म्हाडा, एसआरए अधिकारी यांचे संगनमत असल्यानेच विकासकाने सर्व सामान्य लोकांना वेठीस धरले आहे. पात्र-अपात्रचा घोळ करून शेकडो लोकांना बेघर करण्याचा डाव विकासक रामजी भारवाड यांने केला आहे. अनेक बोगस करारनामे करून त्या सदनिका परस्पर विक्रीस काढल्या आहेत. अपात्र ठरवलेल्या झोपडीधारकांना शासन निर्णय दिनांक १६ मे २०१८ नुसार पात्र ठरवावे व परिशिष्ट-२ मध्ये बोगस करारनाम्यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. ही आमची प्रमुख मागणी असून शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील भ्रष्टाचाराची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी, विकासकाने बांधलेले अनधिकृत बांधकाम ताब्यात घेऊन त्यावर कारवाई करावी, दोन वेगवेगळ्या परिशिष्टांनुसार योजना राबविण्याऐवजी ती एकत्र करण्याच्या मनमानी निर्णयाची चौकशी करावी व म्हाडा आणि एसआरए अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून दिलेल्या परवानग्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राजेंद्र पवार यांनी केली आहे. उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून न्याय न मिळाल्यास न्यायालयीन कारवाईशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचेही पवार म्हणाले.
- 1़ एस.व्ही.रोड,शांतीनगर डोंगरी,दहिसर पुर्व,मुंबई-68 जनकल्याण दहिसर,एसआरए सह.गृह संस्थेच्या नावाने सुरू असलेल्या झोपु योजनेत करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची शासनाने दखल घेऊन चौकशी करावी.
- 2़ ज्या झोपडीधारकांना अपात्र केलेले आहे त्यांना महाराष्ट्र शासन गृहविभाग ,शासन निर्णय क्रमांक झोपुप्रा-0810/प.क्र.96/2018 झोपु-1 ,मंत्रालय,मुंबई 400032. दिनांक 16 मे 2018 च्या आदेशाने पात्र करण्यात यावेत.
- 3़ दिनांक 16 मे 2018 चे परिपत्रक प्रमाणे फॉर्म-3 भरून देखील दखल न घेण्राया अधिक्रायांवर कारवाई करण्यात यावी.
- 4़ सी.सी.प्रमाणेच सादर केलेल्या लास्ट एमेंन्समेंन्ट एप्रोव्हल प्लान प्रमाणे विकासकाने अधिक बांधलेल्या सदनिका ताब्यात घ्याव्यात आणि केलेल्या अधिक बांधकामावर कारवाई करण्यात यावी.
- 5़ विकासकाने उपजिल्हाधिकारी झोपुप्रा यांना परिशिष्ट-2 मधील पात्र-अपात्र झोपडीधारकांच्या व्यतिरिक्त सादर केलेल्या 350 ते 400 बोगस करार नाम्याची चौकशी करावी.
- 6़ जनकल्याण दहिसर एसआरए सह.गृह संस्था. हया नावाने झोपडपट्टी पुनर्वसन योजने मध्ये पार्ट वन व पार्ट टू अशी वेगवेगळे परिशिष्ट-2 असताना ही योजना विकासकाने एकत्रित राबविली याची चौकशी करावी.
- 7़ सी सी प्रमाणे सादर केलेल्या लास्ट अमेंन्समेंन्ट एप्रोव्हर प्लान प्रमाणे बांधकामास परवांनगी नसताना किंवा प्लान न पाहता पुढील थ्ध्घ् बांधकामाला देण्यात आली याबाबत देखील चौकशी व्हावी.
- 8़ म्हाडा, एसआरए अधिकारी आणि विकासक ह्यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या मनमानी पध्दतीच्या भ्रष्ट कारभाराविरूध्द, झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.

१] जनकल्याण दहिसर एसआरए सह.गृह संस्था. झोपु योजनेतील पार्ट एक चे एनेक्सर वन च्या एकूण छायांकित प्रत ४.
२]पार्ट एक च्या परिशिष्ट-२ ची छायांकित प्रती (पाने ५६)
३]पार्ट एक च्या सोडतीची एकूण छायांकित प्रत (पाने २).
४] सी.सी.प्रमाणे सादर करण्यात आलेल्या ॲप्रोर्ड प्लान. इमारत क्र १व२ च्या प्लानची एक एक छायांकित प्रत (प्रती२).
५]पार्ट वन मधील बांधकामास देण्यात आलेल्या LOI च्या छायांकित प्रत( एकूण पाने१३).( सदर माहीती सीडी स्वरूपात पन्नास रूपये भरून मिळालेली RTI अंतर्गत प्राप्त )
६]एसआरए अंतर्गत वास्तुविशारद हयांना ओ.सी साठी देण्यात आलेल्या इमारत क्र १,२ ची छायांकित प्रत ७] पार्ट दोन च्या परिशिष्ट-2 ची छायांकित प्रत.(एकूण पाने १०८)
८]पार्ट दोन च्या इमारत क्र ३व ५ ची लाॅटरी पध्दत नुसार दिनांक २५/०८/२०२४ सोडतीची छायांकित प्रत.(एकूण पाने ८० )
९]इमारत क्र ३ व ५ ला सी.सी आणि ओ.सी न दिल्याबद्दल RTI अंतर्गत मिळालेल्या माहीतीची छायांकित प्रत (एकूण पार्ट पोर्ट पोने एक)
१०]पार्ट दोन: इमारत क्र ३ व ५ च्या ॲप्रोर्ड प्लान ची एक एक छायांकित प्रत. (एकूण २ प्लान )
११] उपजिल्हाधिकारी हयांना अभियांत्रिक विभागा मार्फत बायहाथ देण्यात आलेल्या पात्राची छायांकित प्रत. (विकासकाने झोपडी धारका सोबत केलेल्या करारनाम्याच्या प्रती देण्या सबंधीत.) तसेच दि.१९/११/२०२४ माहीती व २/१/२०२५ अपील अर्ज RTI अंतर्गत केलेले अर्ज जोडत आहे. माहीती देण्यास टाळाटाळ.
१२] परिशिष्ट २ मध्ये अनुक्रमांका सहीत नावे असलेल्या पात्र,अपात्र झोपडी धारका बरोबर विकासकाने केलेल्या करार नाम्यांची प्रत्येकी ऐक ऐक करारनाम्याची छायांकित प्रत.तसेच परिशिष्ट २मध्ये नावे समाविष्ट नसताना देखील केलेला करारनामा त्याची एक छायांकित प्रत. (असेच बोगस करारनामे जमा करतात.) १३]म्हाडा जवळ शासन गृहनिर्माण परिपत्रक दि १६ मे२०१८ प्रमाणे पात्र करण्यासाठी केलेल्या अर्जांची एक एक छायांकित प्रत तसेच हया अर्जावर म्हाडाकडून मिळालेले RTI अंतर्गत मिळालेल्या उत्तराची छायांकित प्रत देत आहे.
१४] अपात्र सदनिकांचा हक्क एसआरए जवळ असतो त्याची RTI अंतर्गत माहीतीची प्रत जोडत आहे.
१५] अपात्र सदनिका एसआरए जवळ हस्तांतरित केल्या नसल्या ने सदर पीएपी योजना नसताना पीएपी आहे म्हणून खोटी माहीती RTI अंतर्गत देण्यात आलेल्या माहीतीची छायांकित जोडत आहे. १६]सेलेबल इमारत क्र ४ हया वेगवेगळा इमारती असताना एसआरए त्यास a,b,c,d विंग दाखविण्यात येत आहे. त्या सबंधीत इमारतीचे नावासहीत छायांकित फोटो.ॲप्रोर्ड प्लान जोडत आहे
१७] ७० जनाचे बायो मॅट्रिक म्हाडा मार्फत पुन्हा केल्या नंतर ही आज पर्यंत कोणताच निर्णय घेण्यात आलेलाच नाही.
आपल्या महीती साठी सांगत आहे कि, पार्ट वन १२०८८.४५ स्कोअर मिटर व पार्ट टू२६,२२२.२२ स्कोअर मिटर आहे तरीपण सदर योजनेचे दोन वेगवेगळे परिशिष्ट २ असताना विकास त्या एकत्रित राबव आहे त्या सबंधीत पुरावा क्रमांक १,२,३ तसेच सर्व ॲप्रोड प्लान पाहिल्यास लक्षात येईल की पार्ट वन साठी बालवाडी,वेल्फेअर,सोसायटी ऑफिस प्रत्येकी चार चार सदनिका आणि पार्ट टू साठी बाळवाडी वेल्फेअर सेन्टर,सोसायटी ऑफिस, युवाकेंद्र,अंगवाडी, हयासाठी ५,६,७ प्रत्येकी सदनिका देण्यात आले आहेत व ऐक कम्युनिटी हाॅल असे ॲप्रोर्ड प्लान पाहिल्यास लक्षात येईल मग ही योजना संयुक्त कशी? ही राबविण्यास परवांणगी कशी दिली गेली. ब)त्याच प्रमाणे पार्ट दोन हा २६,२२२.२२ स्कोअर मिटर चा असताना पार्ट दोन ३८,३१२.२२ स्कोअर मिटर दाखवून विकासक प्रोजेक्ट करीत आहे. ॲप्रोर्ड प्लान इमारत क्र.३व ५ पाहिल्यास लक्षात येईल. क)परिशिष्ट 2 मधील अणुक्रमांका नुसार नावे असलेल्या पात्र,अपात्र झोपडपट्टी धारकांच्या व्यतिरिक्त परिशिष्ट 2मध्ये नावे नसलेले बोगस ५००च्या वर करार नामे उपजिल्हाधिकारी झोपु यांना सादर केलेत.सादर केलेल्या एका बोगस करार नाम्याची छायांकित प्रत माहीती साठी पुरावा क्रमांक १२ मध्ये दिले आहे.
ड)तसेच इमारत क्रमांक ३ व ५हया इमारतीना सी.सी,ओ.सी दिली नसताना देखील लाॅटरी पध्दतीने दिनांक २५/८/२०२४ ला सोडत काढली.त्यासंबंधात माहीती पुरावा क्रमांक ८,९मध्ये दिलेली आहे.
ढ) तसेच विकास काने रिहार्ब इमारतीत स्वताच्या सेल करीता बांधलेल्या २५० सदनिका तसेच कमर्शियल दुकाने व अर्धनिवासी सदनिका ॲप्रोर्ड प्लान पाहिल्यास सर्व माहीत होईल.
ण) विकास सकाने अपात्र सदनिका एसआरए जवळ हस्तांतरित करायच्या आसतात पण त्या २८५ सदनिका हस्तांतरित केलेल्या नाहीत. अपात्र सदनिकेचा हक्क एसआरए प्राधिकरणास असतो. परंतु सदर योजनेत पीएपी नसताना देखील एसआरए अभियांत्रिक विभाग म्हणतो आम्ही इमारत क्रमांक ३ व ५ मध्ये प्रोव्हीजनल पीएपी ची तरतूद केलेली आहे. (सर्व सदनिका विकल्या आहेत ) पुरावा क्रमांक १४,१५पाहणे. त)गृहनिर्माण शासन निर्णय दि.१६ मे २०१८ प्रमाणे पात्र करण्यासाठी जोडत पत्र तीन भरून दिले तरीपण म्हाडा त्याची दखल घेत नाही. पुरावा क्रमांक १३ पाहावे.
थ) पार्ट वन करिता देण्यात आलेला LOI आणि सीसी प्रमाणे दिलेले सादर केला प्लान हयाच्यात आसलेली तफावत. पुरावा क्रमांक ५ पाहावेत.
0 टिप्पण्या