Top Post Ad

बोरिवली येथील कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर उपचार केंद्रातील रुग्ण तसेच त्यांच्या पालकांसाठी निवासी सोय असलेल्या इमारतीचे लोकार्पण

बोरिवली (पूर्व) येथे महानगरपालिका संचालित 'कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर,  बोरिवली (पूर्व) येथे बृहन्मुंबई महानगरपालिका संचालित 'कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग रक्तदोष - कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र' हे रुग्णालय कार्यरत आहे. या रूग्णालयात उपचारांसाठी येणारी मुले आणि त्यांच्या पालकांसाठी निवास, जेवण इत्यादी सर्वंकष व्यवस्था उपलब्ध करून देणारी 'होम अवे फ्रॉम होम' या इमारतीचे लोकार्पण बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते आज  १४ जानेवारी रोजी करण्यात आले. 

यावेळी  उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे, उपआयुक्त (परिमंडळ ७) डॉ. (श्रीमती) भाग्यश्री कापसे, आर मध्य विभागाच्या सहायक आयुक्त  संध्या नांदेडकर, लोकमान्य टिळक सर्वसाधारण रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, केंद्राच्या संचालक डॉ. ममता मंगलानी, उपसंचालक डॉ. संतोष खुडे, ॲक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशनचे सहसंस्थापक श्री. अंकित दवे, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो मधील सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) विभाग प्रमुख श्रीमती माबेल अब्राहम, आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.  कार्यक्रमाच्या प्रारंभी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक  भूषण गगराणी यांच्या हस्ते फीत कापून व दीपप्रज्वलन करून 'होम अवे फ्रॉम होम’ या रूग्ण निवास इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. इमारतीच्या दोन्ही मजल्यांवर असलेल्या रूग्ण निवासी खोल्या, स्वयंपाकघर, मुलांसाठी मनोरंजनाची साधने आणि इतर सर्व व्यवस्थांची देखील आयुक्त  गगराणी यांनी पाहणी केली. 

 याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी संबोधित करताना म्हणाले की, शासकीय व सामाजिक सहकार्यातून अतिशय उदात्त प्रकल्प उभारता येऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे महानगरपालिकेचे 'कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष - कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र होय. त्यातही रुग्ण असलेली मुले व त्यांच्या पालकांच्या निवासाची सोय असणारी इमारत ही सार्वजनिक – खासगी भागीदारीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. या इमारतीचे लोकार्पण करता आले, हे मी माझे भाग्य समजतो. मुंबईमध्ये मुलांच्या उपचारांसाठी येताना निवास, जेवण आणि इतर व्यवस्था कशी होईल? ही चिंता घेऊन येणाऱया कुटुंबाची या सर्व चिंतेतून सुटका करण्याचे मोठे काम या इमारतीमुळे होणार आहे. परिणामी पालकांना आपल्या मुलांच्या उपचारांवर पर्यायाने त्यांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रीत करता येईल. त्यामुळे या इमारतीची संकल्पना प्रत्यक्षात साकारणारे सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत, असेही श्री. गगराणी यांनी नमूद केले. 

 कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष - कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्राच्या डॉ. (श्रीमती) ममता मंगलानी यांनी प्रास्ताविक केले. केंद्राच्या संकल्पनेपासून वाटचालीपर्यंतची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. खासगी रूग्णालयांमध्ये बोन मॅरो प्रत्यारोपणासाठी सुमारे २५ ते ६० लाख रूपयांदरम्यान खर्च येऊ शकतो. तथापि, हेच उपचार या केंद्रात नि:शुल्क होतात. केंद्राच्या उभारणीमध्ये तसेच रुग्ण निवास इमारतीच्या निर्मितीमध्ये सामाजिक घटकांचे मोठे सहकार्य लाभले आहे, त्या बळावर यापुढेही केंद्राची वाटचाल सुरू राहील, असे डॉ. मंगलानी यांनी नमूद केले. अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनीदेखील समयोचित मनोगत व्यक्त केले. केंद्रातील वरिष्ठ सल्लागार डॉ. (श्रीमती) रत्ना शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. 

 *कॉम्प्रिहेन्सिव थॅलेसेमिया केअर, बालरोग रक्तदोष - कर्करोग व बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्राच्या रूग्ण निवास इमारतीविषयी माहिती -
* बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर आणि महानगरपालिकेने बांधलेल्या या इमारतीमध्ये सर्व सुसज्ज व्यवस्था उभी करण्यासाठी ॲक्सेस लाईफ असिस्टन्स फाऊंडेशन आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो यांनी सर्व सहकार्य पुरवले आहे. रूग्ण आणि रूग्णांसोबतचे नातेवाईक यांच्या निवासस्थानाची व्यवस्था असणारी समर्पित इमारत वापरासाठी उपलब्ध झाली आहे. या दुमजली इमारतीमध्ये रूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना राहण्यासाठी एकूण १८ खोल्या आहेत. इमारतीमध्ये स्वयंपाकघर आहे. त्याठिकाणी रेफ्रिजरेटर, भांडीदेखील पुरविण्यात आली आहेत. इमारतीमध्ये लॉकर, वॉशिंग मशीन तसेच लहान मुलांकरिता मनोरंजनाच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. *सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्राविषयी -* महानगरपालिकेचे "कॉम्प्रिहेन्सिव थॅलासेमिया केअर, बालरोग, रक्तदोष, कर्करोग आणि बोनमॅरो प्रत्यारोपण उपचार केंद्र" अर्थात "सीटीसी, पीएचओ व बीएमटी उपचार केंद्र" हे अविरतपणे कार्यरत आहे. नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचे वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी या केंद्राकडून सातत्याने आत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. याचाच एक भाग म्हणून थॅलेसिमियाग्रस्त, रक्तदोषाने आणि कर्करोगानेग्रस्त बालकांना सामान्य बालकांप्रमाणे जीवन जगता यावे, या उद्देशाने २०१७ मध्ये महानगरपालिकेने बोरिवली (पूर्व) परिसरात हे उपचार केंद्र सुरू केले. 

या केंद्रात जून २०१८ पासून बोनमॅरो प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या केंद्राला समाजातील सर्व स्तरातील सहकार्य मिळाले आहे. या केंद्राकरिता टाटा ट्रस्ट यांनी प्रारंभी १० कोटी रूपये देणगी दिली होती. पंतप्रधान सहायता निधी, मुख्यमंत्री सहायता निधी यांचेसह कॉर्पोरेट जगतातून व समाजातील अनेक देणगीदारांच्या सहकार्यातून आतापर्यंत सुमारे ५० कोटी रूपयांहून अधिक निधी प्राप्त झाला आहे. परिणामी रूग्णांना सर्वोत्कृष्ट उपचार निशुल्कपणे पुरवणे शक्य होत आहे. *सीटीसी, पीएचओ आणि बीएमटी उपचार केंद्राची कामगिरी -* • साडेसात वर्षांमध्ये बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी ६८ हजार ९५९ उपस्थितीची नोंद (फॉलोअपसह). तर नवीन ७,५०० रुग्णांची नोंद. • आजवर थॅलेसेमिया उपचारासाठी १९५५ रूग्ण दाखल • कर्करोग असणारी १३३१ बालके आणि रक्तदोष असणाऱया १४८३ बालकांवर उपचार • जून २०१८ पासून जानेवारी २०२५ पर्यंत ३९१ बोनमॅरो प्रत्योरोपणाची (बोन मॅरो ट्रान्सप्लांट / बीएमटी) कार्यवाही पूर्ण. या केंद्रात दरवर्षी सुमारे ६० ते ८० प्रत्यारोपण. • बीएमटी फिजिशियन, बालरोग रक्तदोष कर्करोग तज्ज्ञांसह एक पथक या सेवेसाठी समर्पित.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com