Top Post Ad

अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वतीने पुण्यात बी-टू-बी परिषदेचे आयोजन

भारतीय कृषी क्षेत्रात अमुलाग्र परिवर्तन करण्यासाठी खते आणि शेती औषधे निर्मिती क्षेत्रात कार्यरत असणाऱी ऑल इंडिया अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेतला असून याचाच एक भाग म्हणून पुण्यात अखिल भारतीय ऑल इंडिया मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने बीटूबी परिषद आयोजन केले आहे. कृषी इनपुट क्षेत्राला समर्पित एक विशेष प्रदर्शनासह या परिषदाचे पुण्यातील कोरेगाव पार्क येथील द वेस्टिन हॉटेलमध्ये आयोजन केले आहे. येत्या ३ आणि ४ मार्च रोजी ही परिषद होईल अशी माहिती एआयएम असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी दिली. मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित अखिल भारतीय अँग्रो इनपुट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोबत सचिव समीर पाथरे आणि खजिनदार सर्जेराव शिसोदे उपस्थित होते.

  कृषी- निविष्ठा (इनपुट) उद्योगाचे सक्षमीकरण करण्यासाठी तसचे भारतातील कृषी- निविष्ठा (इनपुट)  उद्योगाला बळकटी देण्याचा प्रयत्न या परिषदेव्दारे केली जाणार आहे, ज्यामुळे जोडणी, सहयोग आणि वाढीसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल. हा कार्यक्रम उत्पादक, पुरवठादार, उद्योग तज्ञ आणि उद्योजकांना संधी शोधण्यासाठी,  नियामक चौकटींवर चर्चा करण्यासाठी आणि बायोस्टिम्युलंट्स, जैव कीटकनाशके आणि जैव खतांमधील नवीनतम प्रगती प्रदर्शित करण्यासाठी एकत्र आणेल. शंभर हून अधिक स्टॉल्स या परिषदेत मांडली जाणार आहे. त्याशिवाय अत्याधुनिक कृषी निविष्ठा (इनपुट)  उपाय, नाविन्यपूर्ण कच्चा माल आणि शाश्वत शेती तंत्रज्ञानाचे प्रदर्शन यात सादर होणार आहे.

  परिषद सत्रांमध्ये बायोस्टिम्युलंट नियम, कर धोरणे, उद्योग आव्हाने आणि भविष्यातील वाढीच्या शक्यतांबद्दल अंतर्दृष्टी.  उद्योग नेटवर्किंग: B2B कृषी-इनपुट क्षेत्रातील प्रमुख घटकांना जोडणारे विशेष नेटवर्किंग सत्रे,  लघू आणि मध्यम उद्योजकीय क्षेत्रातील लहान आणि उदयोन्मुख व्यवसायांकडून सहभागाला प्रोत्साहन देणे. , आयात अवलंबित्व कमी करणे: आयात केलेल्या कच्च्या मालाला पर्याय म्हणून भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन देणे. व्यवसाय संबंध निर्माण करण्यासाठी आणि बाजार विस्ताराच्या संधींचा शोध घेण्यासाठी या व्यासपीठाचा फायदा घेण्यासाठी देशभरातून खत तसेच शेती औषधे तसेच उत्पादन उपयुक्त मिशनरी, आधुनिक शेती तंत्रज्ञान निर्मिती करणाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.

एआयएमतर्फे आयोजित ही दुसरी परिषद आहे. गेल्यावर्षी दिल्लीत ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेतील स्टॉलच्या मर्यादेमुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. म्हणूनच उत्पादक, पुरवठादार, उद्योजक आणि उद्योग व्यावसायिकांना या परिवर्तनकारी परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन धुरगूडे पाटील यांनी केले. नोंदणी, प्रायोजकत्व आणि स्टॉल बुकिंगबद्दल अधिक माहितीसाठी, abc.aimassociationindia.com ला भेट द्या किंवा +९१ ९६८९१५२८३७ वर संतोष दळवी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन समीर पाठारे यांनी केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com