भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु होत असतानाच संविधानावर घाला घातला गेला आणि या दरम्यान मोठे आंदोलन होत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून ते आंदोलन थोपवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्यांला मारहाण झाली व वैद्यकीय उपचारादरम्यान दिनांक 15 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. सलग तीन दिवस परभणीतील वातावरण संवेदनशील बनलं होतं. अनेक कार्यकर्त्यांवर जाणिवपूर्वक गुन्हे नोंदवले गेले. त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकारणाची अद्याप सखोल चौकशी न करता शासन चालढकल करत असल्याच्या निषेधार्थ आज परभणी ते मुंबई असा लाँगमार्च काढण्यात आला आहे. युवा नेते आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या "न्याय लॉंगमार्च" मध्ये भिम आर्मीचे परभणी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जोंधळे व महासचिव मनोज कांबळे यांच्या नेतृत्वात शेकडो भीमसैनिक सहभागी झाले आहेत.
--------------------------------------------------------------
रोहीत, पायल ते सोमनाथ....
रोहित वेमुला दलित नव्हता”, असे सांगून काँग्रेसच्या सरकारने आणि पोलिसांनी केली फाईल बंद, सर्व आरोपींना क्लीन चीट त्यात बहुतांश भाजपचे
पदाधिकारी होते !
रोहित वेमुला या २६ वर्षीय विद्यार्थ्याने १७ जानेवारी २०१६ रोजी हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाच्या वसतिगृहातील खोलीत आत्महत्या केली होती. रोहितने आत्महत्या केल्यानंतर देशभरात आंदोलन उभे राहिले होते. रोहित वेमुलाला न्याय देण्यासाठी अनेक आंबेडकरवादी संघटना पुढे आल्या होत्या. या प्रकरणात ३ मे २०२४ रोजी एक माहिती समोर आली आहे. तेलंगणा पोलिसांनी रोहित वेमुला मृत्यू प्रकरणाची फाईल आता बंद केली आहे. तसेच सर्व आरोपींना क्लीन चीट दिली आहे. रोहित वेमुला हा दलित नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान रोहित वेमुलाच्या कुटुंबियांनी पोलिसांवर आरोप करत ते भाजपाची मदत करत असल्याचा आरोप केला तसेच या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडावी, अशी मागणी केली.
त्या नंतर घटना घडली ती पायल तडवी हिची आत्महत्या..प्रकार तोच उच्च वर्णीय सिनियर विध्यार्थिनी ह्यांनी केलेला छळ ह्या मुळे तिला देखील आत्महत्या करावी लागली.डॉ. पायल हिने २२ मे २०१९ रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करून तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या करावी लागली.
परभणीत संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाल्यानंतर दगडफेक आणि हिंसाचाराची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. यात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. सूर्यवंशी या तरूणाच्या मृत्यूनंतर राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. सूर्यवंशी मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली जात होती. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात खोटी माहिती दिली आहे.सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
या रिपोर्टनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. पोलीस कोठडीतून ते जेव्हा एमसीआरमध्ये गेले. तेव्हा सूर्यवंशी यांना जळजळ होत होतं. तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी बनावट माहिती फडणवीस यांनी दिली होती.
दोन्ही घटनेत काय समानता आहे ? तर दोन्हीही सरकारी व्यवस्थेने केलेले खून आहेत.मात्र काँग्रेस असो की भाजप दलित, आदिवासी असो की इतर कुठलाही समूह ते खून्याचे समर्थन आणि बचाव दोन्ही करणारच.हा राष्ट्रीय पॅटर्न आहे.
राजेंद्र पातोडे
प्रदेश महासचिव , वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेश
-----------------------------------------------------------------------------------
0 टिप्पण्या