महाबोधी महाविहार म्हणजे तथागत भगवान बुध्दाच्या `बुध्दत्व' प्राप्तीचे स्मृतिचिन्ह. ते बिहार राज्यातील गया या ठिकाणी आहे. या पवित्र स्थळी भगवान बुध्दांना ज्ञान प्राप्त झाले. वर्तमान महाबोधी विहार प्रथम इसवीसन 218 साली बांधण्यात आले. या विहारमध्ये इसवीसन 380 साली तेजस्वी, सर्वांग सुंदर अशी बुध्द प्रतिमा स्थापित करण्यात आली. इसवीसन 666 साली भारतात प्रवासाला आलेल्या चिनी प्रवाश्यांनी आपल्या प्रवास वर्णानामध्ये या विषयीचा उल्लेख केला आहे. इसवीसन पूर्व 260 मध्ये सम्राट अशोकापासून सतत 1500 वर्ष या ठिकाणी बौध्दांचे आवागमन राहिले. बौध्द धर्मिय राजे - महाराजांनी आपल्या दानाने या विहाराला समृध्द केले. या विहाराची प्रतिमा व प्रतिष्ठा वाढवली. मात्र भारतातील सत्तांतरानंतर हे महाविहार आज हिन्दुंच्या ताब्यात आहे. याबाबत अनेक वर्षापासून लढा सुरू आहे. हा लढा आता शेवटच्या टप्प्यावर आणून हे विहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी संभाजीनगर शहरामधील भिक्खु संघ तसेच बुद्धजीवी वर्गाच्या उपस्थितीत २९ आणि ३० डिसेंबर असे दोन दिवस धम्मभूमी बुद्धलेणी संभाजीनगर येथे बैठक संपन्न झाली. भिक्खु विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली, महाबोधी महाविहार (बोधगया) मुक्ती आंदोलनांची भविष्यातील रुपरेषा ठरविण्यासाठी ऑल इंडिया बुद्धीस्ट फोरमची कार्यकरणी व लामा रीपोंचे बोधगया येथुन प्रज्ञाशिल (महाथेरो) तसेच बुद्धगया मधील वरीष्ठ भिक्खु व भिक्खुनी संघ तसेच समता सैनिक दल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय बौद्ध महासभा, भिम आर्मी, बामसेफ, महाबोधी सोसायटी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट सोसायटी अशा अनेक संघटना उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या