Top Post Ad

EVM मशीनचे गौडबंगाल आणि निवडणुका - जबाबदार कोण?

EVM मशीन चा प्रस्ताव संसदेत ज्या माणसाने ठेवला त्या माणसाचे नाव आहे - अभिषेक मनू संघवी (काँग्रेस) ह्याचा प्रस्ताव क्रमांक आहे. 422/1984 , या प्रस्तावावर पहिला_अनुमोदन देणारा व्यक्ती चे नाव आहे अटल बिहारी वाजपेयी (भाजपा) आणि दुसरा अनुमोदन देणारा व्यक्ती हा प्रकाश_खरात (सीपीआय) EVM ला जबाबदार काँग्रेस, भाजपा आणि  सीपीआय हे तीन पक्ष.  यांनी EVM मशीन भारतात आणले. याचे कारण मान्यवर कांशीराम यानी भारतात प्रथमच बहुजनातील तळागाळातील जनसामान्यांना घेऊन नवीन पक्षाची स्थापना केली होती.   बहुजन समाज पार्टीचा झंझावात उत्तरप्रदेश नंतर संपूर्ण देशात सुरु होता. याला थांबवण्यासाठी सर्वसामान्य बहुजनांना, सर्वसामान्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या पुढाकाराने धनदांडग्या लोकांच्या पक्षांनी evm मशीन भारतात आणले.

  EVM ला माजी प्रधानमंत्री मंडल मसीहा व्ही.पी.सिंह यांनी पहिल्यांदा विरोध केला होता. राष्ट्रपती आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहून लिखित विरोध केला, पण काहीं केल्या व्ही.पी.सिंह यांचे ऐकले नाही. पुन्हा 24 सप्टेंबर 1985 ला हा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर झाला. लगेच 2 जानेवारी 1986 ला राष्ट्रपती ग्यानी झेल सिंग यांनी या प्रस्तावावर सही केली आणि हे EVM मशीन वापरण्याचे बिल भारतात लागू झाले. म्हणजेच  EVM  बिल भारतात आणण्यासाठी  सगळ्यात जास्त हात आणि ज्यादा काम कोणी केले असेल तर ते काँग्रेसने आणि भांडवलदारी पक्षांच्या लोकांनी. म्हणून आजही हे लोक EVM मशीनच्या विरोधात काही एक शब्द काढताना दिसत नाहीत. आताही ते दबक्या आवाजातच बोलत आहेत कारण ते आज EVM ची शिकार झाले आहेत. 

2003 पूर्वी 1989 ला पायलट प्रोजेक्ट म्हणजे नमुना चाचणी माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या काळात या EVM मशीन चा पायलट प्रोजेक्ट म्हणून उपयोग केला. आणि नंतर 2003 मध्ये या दोन कंपन्यांनी EVM मशीन काँग्रेसला दिले. काँग्रेस 2004 मध्ये आणि 2009 मध्ये या EVM मशीन द्वारे जिंकून आली. काँग्रेसची वेळ संपल्यानंतर भाजपा 2014 आणि 2019 मध्ये EVM मशीन द्वारे जिंकून आले.  भाजपा जिंकून येण्यासाठी ज्या अडचणी होत्या त्या कायदा बनवून काँग्रेसने दूर केल्या - 56C, 56D, 49MA हे कायदे ते आहेत ज्यामुळे भाजपा सुरक्षित घोटाळा करून जिंकून आली.

 गुजरात राज्यात सर्व प्रथम निवडणूक आयोगाने पूर्णपणे इव्हिएम प्रक्रिया राबवली. २००२ साली गुजरात मधील अनेक स्वयंसेवी संस्थांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतली. पण संघी न्यायाधीशांनी हि केस अकरा वर्षे पेंडींग ठेवून शेवटी खारीज केली. २०१३ ला सर्व राजकीय पक्षांनी (भाजप सोडून) एकत्र येऊन इव्हिएम विरोधी कृती समिती स्थापन केली‌. या समीतीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव होते. २०१४ ला भाजप इव्हिएम घोटाळे करून निवडून आल्यानंतर पहिल्या प्रथम लालुप्रसाद यादव यांनाच इडी ची खोटी केस लाऊन तुरूंगात टाकले. गेल्या तीस वर्षांत आर एस एस ने निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, प्रशासन, इडी सिबीआइ आय टी आय बी, गोदी मिडीया अशा लोकशाहीच्या महत्वाच्या संस्थांमध्ये माणसं पेरून विरोधी पक्ष नेते, लोकशाही  पुर्णपणे निष्प्रभ केली. 

 EVM मशीन बनविण्याचे कॉन्ट्रॅक्ट ज्या कंपनी कडे देण्यात आले त्या कंपनीचे नाव आहे (ECIL) इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि दुसरी कंपनी आहे (BEL) भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. यामध्ये जी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनी आहे ती ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे, ही कंपनी फक्त भारतातच ब्लॅक लिस्टेड कंपनी नाही तर संपूर्ण जगात ब्लॅक लिस्टेड कंपनी आहे. वरील दोन्ही कंपन्यांनी EVM मशीन 2003 मध्ये बनविले आहे. देशाचा आज जो सत्यानाश ज्या कारणामुळे झालेला आहे ते संपूर्ण कारण आम्हाला माहिती असले पाहिजे नाहीतर पुन्हा फसवणूक होऊ शकते.  इव्हिएम विरोधात जनआंदोलन लढा हाच एकमेव लोकशाही टिकवण्याचा मार्ग आहे नाही तर लोकशाही आणि निवडणूका फक्त दिखावा असेल.

  • लोकशाही तथा संविधान चिंतक 
  • आम्ही भारताचे लोक
  • ----------------------------------------------------------------------
 *"मतपत्रिकेवर मतदानासाठी लोक चळवळ"*
*(ईव्हीएम हटाओ, देश बचाओ!)*
*विषय: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ निकाल - जनतेचा *’ईव्हीएम + व्हीव्हीपॅट”* निवडणूक प्रणालीवर विश्वास उडाला आहे!*
*तारीख: शनिवार १४, डिसेंबर २०२४*
*वेळ: दुपारी २ ते ६*
*स्थळ : २ रा मजला, मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई सीएसएमटी जवळ, मुंबई ४००००१.*
*तंत्रज्ञ, कायदेतज्ञ, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांचे सादरीकरण*
मारकड वाडी गावाचे प्रतिनिधी.
प्रमुख पाहुणे : 
मा. उत्तमराव जानकर, आमदार (NCP SP), 
मा. रणजित मारकड, सरपंच (मारकड वाडी गाव, जिल्हा सोलापूर)
*वक्ते:*
१. मा. तुषार गांधी
२. ⁠न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील (निवृत्त)
३. ॲड. मेहमूद प्राचा (सर्वोच्च न्यायालय)
४. ⁠मा. निरंजन टकले
५. ⁠मा. तीस्ता सेटलवाड
६. ⁠प्रा. अमित उपाध्याय
७. ⁠मा. फिरोज मिठीबोरवाला
८. ⁠मा. धनंजय रामकृष्ण  शिंदे
*EVM + VVPAT या यंत्राच्या घोळाचे प्रत्यक्ष सादरीकरण (Demonstration)* 
*आयोजन समिती*
ॲड. अमीन सोलकर, 
मा. शरद कदम, 
मा. संतोष आंबेकर, 
मा. एम.ए. खालिद 
मा. गुड्डी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com