केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत बोलत असताना डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवहेलना करणारे वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भीम आर्मी मुंबई प्रदेश च्या वतीने राजगृह ते दादर पूर्व रेल्व स्थानक असा निषेध मार्च तसेच निदर्शने केली. अमित शाह यांनी आपल्या वक्तव्याबाबत माफी मागावी तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचा राजीनामा घेऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपला आदर व्यक्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विरोधकांवर टीका करीत असता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करीत बाबासाहेब यांच्या ऐवजी देवाचे नाव घेतल्यास स्वर्गात जागा मिळेल असे वक्तव्य केले होते.त्यांच्या या वक्तव्याचा देशभरात निषेध केला जात आहे.मुंबई भीम आर्मीने आज मुंबई अध्यक्ष अविनाश गरूड यांच्या नेतृत्वात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान राजगड ते दादर रेल्व स्थानक असा निषेध मार्च काढला.दादर रेल्वे स्थानकाबाहेर यावेळी निदर्शने करण्यात आली.
भीम आर्मीचे राष्ट्रीय सरचिटणीस अशोक कांबळे ,माजी कार्याध्यक्ष सुनीलभाऊ गायकवाड, दिनेश शर्मा, अय्याज पंसारी,रवि बागुल ,विजय कांबळे,राजकुमार साळे, सुरेश धाडी,प्रकाश पाईकराव, प्रकाश ईंगावले, तुषार कदम यांच्यासह शेकङो पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सदर आक्रोश मोर्चा रविवार दि. २२ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्तंभ, शिवडी क्रॉस रोड, गेट नं. ६ येथून सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करीत शांततेच्या मार्गाने निघाला, सदर मोर्च्यात कोणत्याही राजकिय पक्षाचे झेंडे, बॅनर न घेता केवळ राष्ट्रध्वज व आंबेडकरी चळवळीचा ज्वलंत इतिहास सांगणारा निळा ध्वज हेच सामील झाले होते. विभागातील सर्व शाखा व संविधानप्रेमी संघटनांनी यात सहभाग घेऊन र.फी.अ.की. कीडवाई मार्ग पोलिस ठाणे येथे मोर्चा नेला व संबंधित पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी संदीप रणदिवे यांना तमाम भारतीय संविधान प्रेमी जनता यांनी निवेदन सादर केले. सदर निवेदन सादर केल्यानंतर शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना मुक श्रध्दांजली अर्पण करून सदर मोर्च्याची सांगता करण्यात आली तद्नंतर मोर्च्यात सहभागी तमाम संविधान व आंबेडकर प्रेमी जनता कोणत्याही सरकारी नियमांचे उल्लंघन न करता अत्यंत शांततेत आपापल्या गंतव्यस्थानी मार्गस्थ झाले.
0 टिप्पण्या