Top Post Ad

अरबी समुद्रातील नियोजीत शिवस्मारकाच्या जलपूजनाचा ८ वा वर्धापन दिन

२४ डिसेंबर २०१६ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  अरबी समुद्रातील नियोजित शिवस्मारकाचे काम प्रत्यक्षाने सुरु व्हावे म्हणून स्वतः शिवस्मारक ठिकाणी 'जलपूजन' व 'भूमिपूजनाचा'  कार्यक्रम घेतला. त्याचीच कृतज्ञता म्हणून आम्ही त्याच तारखेला म्हणजे २४ डिसेंबर २०२४ ला त्याच नियोजित जागी, अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या जलपूजनाचा ८ वर्षांनंतरचा (प्रत्यक्षात काम सुरु झाले नयन्ले तरी) वर्धापन दिन साजरा करीत आहोत. अशी माहिती सकल शिवप्रेमी शिवस्मारक समिती, महाराष्ट्रच्या वतीने प्रा. चंद्रकांत भराट, (अध्यक्ष, छावा मराठा युवा संघटना महाराष्ट्र) सुरेश वाकडे (सचिव छावा) अशोक वीरकर (मल्हार सेना अध्यक्ष) सतिश वेताळ, (उपाध्यक्ष छावा) प्रदीप सांवत (मेस्टा सदस्य) संजय तायडे (मेस्टा अध्यक्ष) चंद्रकांत सावंत (मराठा समन्वयक) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

ज्या राजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केले, जी भूमी, जो समुद्र, मुस्लीम शाह्यांच्या छाताडावर बसून महाराष्ट्राच्या रयतेच्या हातात दिले, त्याच राजाच्या स्मारकासाठी गेल्या ३० वर्षापासून प्रत्येक सरकारने फक्त आणि फक्त राजकारणच केले. आजही तीच परिस्थिती आहे. म्हणून या निर्दावलेल्या सरकारला आठवण म्हणून हे 'प्रतिकात्मक जलपूज' उद्घाटन करीत आहोत. '२०१३ साली नरेंद्रजी मोदी यांनी गुजरातला सरदार वल्लभभाई पटेलचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले आणि लगेच काम सुरु करून  ४२ महिन्यात बांधून पूर्ण केले व ३१ ऑगस्ट २०१८ ला लोकार्पण केले.' परंतु १९९४ साली सर्वात प्रथम 'छावा' मराठा युवा घटनेने अरबी समुद्रात स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या धर्तीवर नव्हे त्याही पेक्षा मोठे शिवस्मारक निर्माण करावे, म्हणून शासनाकडे पाठपुरावा केला होता. तेव्हापासून प्रत्येक सरकारने फक्त राजकारणच कले ते असे.

  • घटनाक्रम १४ जून १९९६
  • तत्कालीन शिवसेना भाजपा युती सरकार मुख्यमंत्री मा. मनोहर जोशी यांनी शिवस्मारक बांधण्याची घोषणा केली. त्यावेळी १०० कोटी खर्च प्रस्तावीत होता.
  • १९९७ - मुंबई पालकमंत्री १० सदस्यांची अशासकीय समिती नेमली.
  • १९९९-  : स्मारक समितीचा अहवाल शासनास सादर केला.
  • २००१ : मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची विधान परिषदेत शिवस्मारक उभारणीचे आश्वासन व समितीची रचना केली.
  • २००४ : मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची घोषणा केली
  • २००५: मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शिवस्मारक उभारणीचे निर्देश दिले.
  • २००९ : २००९ ते २०१३ पर्यंत वेगवेगळ्या परवानग्यासाठी काम रेंगाळले तसेच मुंबई न्यायालयात याचिका दाखल झाली ती फेटाळली गेली.
  • २०१४ :  शिवसेना भाजपने तत्कालीन निवडणूकीमध्ये विधानसभेच्या जाहीरनाम्यात शिवस्मारक उभारणीचा मुद्दा घेतला होता.
  • २०१५: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने शिवस्मारकासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या २२ परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न केला.
  • २०१६ : २४ डिसेंबर २०१६ ला मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते जलपूजन व भूमिपूजन कार्यक्रम घेतला ते मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून.
  • २०१७ : शिवस्मारकाची नियोजित उंची १९२ मीटर वरुन २१२ मीटरचा ठराव केला.
  • २०१८ :  शिवस्मारकाचे काम प्रत्यक्षात सुरु न होताच खर्च किंमत मात्र ७०० कोटी वरुन २५०० कोटी नंतर ३००० कोटी पर्यंत गेली परंतु काम सुरु झाले नाही.
  • २०१८ ला एल अॅण्ड टी कंपनीला शिवस्मारक उभारण्याची निविदा देवून वर्क ऑर्डर दिली. परंतु काम सुरु झाले नाही.
  • २०१९ : १३ जानेवारी २०१९ ला पर्यावरणवाद्यांनी न्यायालयात केस केली, त्याला सर्वोच्च न्यायालयाने तोंडी स्थगिती दिली, ती आज पर्यंत कायम आहे.
नियोजित शिवस्मारक अरबी समुद्रामध्ये राज्यपाल भवनापासून १.५ कि.मी गिरगांव चौपाटी पासून ३.५ कि.मी. नरिमन पॉईंट पासून ५.५ कि.मी. समुद्रात ७.१ हेक्टर जागेवर महाराजांचे जगातील सर्वात उंच स्मारक होणार आहे. २०१८ मध्ये एल अॅण टी कंपनीने समुद्रातील जागेचे सर्वेक्षण करुन त्या करीता लागणारे ५० भूस्तर बोअर घेतले व परिक्षण केले. तरीही स्मारकाचे काम सुरु झाले नाही, परंतु कोर्ट कचेरी, सल्लागार, आर्किटेक्ट या यासाठी आजपर्यंत सुरुवातीला ३५ कोटी रुपये खर्च झाले, त्यानंतर २००कोटी रुपये खर्च झाले. काम काहीच नाही.
कोणत्या वर्षात किती रक्कम खर्च झाली.
१) वर्ष २०१३-१४ ला ३.८९ कोटी 
२) २०१४-१५ ला ३.०६ कोटी 
३) २०१५-१६ ला ५.२३ कोटी
४) २०१६-१७ ला १२.०५ कोटी
५) २०१८-१९ ला ९.५ कोटी

असा एकूण २०० कोटी रुपये आजपर्यंत खर्च झाला आहे, परंतु शिवस्मारकाचे काम अद्यापही बंद आहे. सरकारला याची थोडी लाज वाटावी म्हणून  महाराष्ट्रातील आणि हिंदुस्तानातील सर्व जाती धर्मिय, शिवप्रेमी, शिवभक्त, सकल मराठा समाज, छावा मराठा युवा संघटना व समविचारी संघटना येत्या २४ डिसेंबर रोजी सकाळी ११:०० वा. गिरगांव चौपाटी येथे समुद्र किनारी पुन्हा एकदा 'जलपूजनाचा' आठवा वर्धापन दिन हर्ष उल्हासात, आनंदाने शिवस्मारकाचे काम सुरु न झाल्यामुळे हा आनंद व्यक्त करीत आहोत. २४ डिसेंबर च्या जलपूजन कार्यक्रमानंतर प्रतिकात्मक शिवस्मारक रथ मुंबई वरुन संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी शिवस्मारक बांधकाम निधी सरकारला मदत देण्यासाठी जाणार आहे. तरी शासनाने १९ फेब्रुवारी २०२५ पर्यंत शिवस्मारकाचे काम सुरु करावे, अन्यथा ते काम महाराष्ट्राच्या जनतेच्या हातात द्यावे. ते स्मारक आम्ही पूर्ण करु असे आवाहनही पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. 

  •  प्रा. चंद्रकांत भराट,
  • जिजामाता हाऊसिंग सोसायटी, प्लॉट नं. 10 सिडको एन - 5 छत्रपती संभाजीनगर
  • मो. 9422201765, 9422294004

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com