डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना देशभर आदरांजली वाहिली जात असतानाच विरार येथील उभरते कला दिग्दर्शक राकेश सुतार उर्फ राका यांनी तब्बल ३९९९स्क्रू जोडून बाबासाहेबांची आकर्षक प्रतिकृती निर्माण केली आहे.या अभिनव प्रयोगाचं सर्वत्र कौतुक होत आहे. राका आणि त्यांचे बंधू सचिन,बहीण सुनीता,आई राजश्री आणि वडील रघुनाथ लक्ष्मण सुतार या संपूर्ण कुटुंबाने तब्बल पाच दिवस रात्र मेहनत घेऊन चिकाटीने हे काम पूर्ण केले आहे.
दोस्त कला मंच आयोजित,हर सवाल का जवाब...बाबासाहेब या संगीतमय आदरांजली कार्यक्रमात दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या प्रवेशद्वारावर २ डिसेंबर रोजी ही कलाकृती उभारण्यात आली होती. पाच डिसेंबर सायंकाळ पासून सहा डिसेंबर रोजी पूर्ण दिवस आंबेडकर उद्यान,चेंबूर इथे ही प्रतिकृती लोकांना पाहण्यास उपलब्ध आहे.रीपाई नेते अशोक विठ्ठल जाधव यांच्या पुढाकाराने ही प्रतिकृती उभारण्यात आली आहे.
0 टिप्पण्या