Top Post Ad

मुंबई महानगरपालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेत १ हजार ८२१ बॅरिकेड्सची स्वच्छता...

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी आज रविवार, दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यात, एकाच दिवसात २७३ मेट्रिक टन राडारोडा (डेब्रीज) आणि ३०४ मेट्रिक टन कच-याचे संकलन करण्यात आले. तर, ५२ किलोमीटर लांबीचे रस्ते स्वच्छ करण्यात आले.१,८२१ बॅरिकेड्स धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत.मुंबई महानगरात गत ५२ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे.

   


संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत शनिवार १४  आणि रविवार १५ डिसेंबर, सर्व प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.  महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनानुसार आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर ) डॉ. (श्रीमती) डॉ. अश्विनी जोशी यांच्या नेतृत्वाखाली आणि उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन)  किरण दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या या विशेष स्वच्छता मोहिमेत विभाग पातळीवर व्यापक कार्यवाही करण्यात आली. १ हजार ६८२ कामगार–कर्मचा-यांनी २०१ संयंत्राच्या सहाय्याने ही कामगिरी केली आहे. जेसीबी,डंपर, कॉम्पॅक्टर, कचरा संकलन करणारी वाहने, पाण्याचे टँकर अशी विविध वाहने आणि फायरेक्स मशीन, मिस्टींग मशीन आणि अन्य अद्ययावत यंत्रणा दिमतीला होती

.बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेअंतर्गत संपूर्ण बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज दिनांक १५ डिसेंबर २०२४ साठीची कार्यस्थिती:  -  आजच्या विशेष स्वच्छता मोहिमेत  १,८२१ बॅरिकेड्स धुवून स्वच्छ करण्यात आले आहेत . ज्याची लांबी सुमारे ६ किलोमीटर आहे. स्वच्छता मोहिमेत १, ६८२ मनुष्यबळ सहभागी झाले होते. त्यात १०६० महानगरपालिका कर्मचारी आणि ६२२ स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांचा समावेश होता. जेसीबी, डंपर, पाण्याचे टँकर, मेकॅनिकल स्वीपर, फायरएक्स मशीन अशा संयंत्रांचा वापर करण्यात आला.... सुमारे ३०४ मेट्रिक टन कचरा, २७३ मेट्रिक टन राडारोडा घनकचरा स्वच्छता विभागाने संकलित केला. २२ टन अडगळीतील कचरा, गाळ आणि घनकचरा स्वच्छ करण्यात आला.  ९ टन बागकाम कचरा व वाढलेली झाडे झुडुपे हटवण्यात आली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com