महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने भारतीय संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारले नाहीत, एवढेच काय सत्तेत राजकीय सामाजिक शैक्षणिक आर्थिक मानसिक बौद्धिक क्षेत्रात जातीवाद पाळून या आंबेडकरी वैचारिकता बुद्धिवंत आंबेडकरी व्यक्तींना कधीच सोबत घेतले नाही ,परंपरावादी जातीवादी कौटुंबिक परिवारवाद जोपासला. त्यामुळे असंतुष्ट राजकारणी ओबीसी एस सी एस टी एन टी सर्व भाजपाकडे सत्तेसाठी आकर्षित झाले शेवटी प्रत्येकाला सत्तेत सहभागी होण्याचा अधिकार, लोकशाही शासनप्रणाली डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील प्रत्येक व्यक्तीस दिली. मत देण्याचा आणि सत्तेत जाण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयांना आहेच मग ज्यांना ती संधी जिथे मिळाली तिथे लोक आकर्षित झाले. पद पैसा सत्ता जिथे मिळाली तिथे जाणारे गेले. हेच जर काँग्रेसच्या राजकारण्यांनी आधीपासून केले असते तर आज मनुवादी प्रवृत्तीच्या हातात स्वतंत्र भारत आणि पुरोगामी महापुरुषांच्या वैचारिक प्रबोधनकार संतांचा महाराष्ट्र गेला नसता
सहा डिसेंबर भारतीय संविधानकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी बाबरी मसजिद पाडली हे कट्टर हिंदुत्ववादि म्हणजेच मनुवादी पेशवे होत .पाच डिसेंबरला महाराष्ट्रात दादर शिवाजी पार्क मैदानात जिथे सहा डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाला लाखो जनसागर येतो त्याच दिवशी यांनी शपथविधी कार्यक्रम घेतला आणि त्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनविले ज्यांनी नागपूर अंबाझरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सांस्कृतिक भवन उद्ध्वस्त केले. यांच्यासोबत काही स्वयंघोषित जयभीमवाले पद पैशाच्या सत्तेच्या लालसेने सामील झालेत, तिथेच पुरोगामी महापुरुषांच्या ,संतांच्या मानवी इतिहासातील मानवतावादी महाराष्ट्रातील सत्ता मनुवाद जोपासणाऱ्यांच्या हातात गेली.जे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिकतेला गद्दार बेईमान झाले हे आधी काँग्रेस सोबत होते ज्यांमधे डॉ बाबासाहेब आंबेडकरांशी फक्त आणि फक्त जातीच नातं आहे विचाराचं नाही असे दगडा पेक्षा विट मऊ म्हणणारे अजूनही बेईमान आंबेडकरी काँग्रेससोबत आहेत पण आंदोलन उभारून निधी पैसा लाटण्यासाठी ते या पेशवाईसोबत साठ गाठ करीत असतात कारण काही काँग्रेसी सुधा त्याच विचारांचे आहेत ते आत्ता महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत जाहीरपणे उघड झाले. हे छुपे आंबेडकरी दुश्मन होत. भाजपाची भूमिका ही जाहीर आहे, पण काँग्रेसी छुप्या पद्धतीने आंबेडकरी चळवळ नष्ट करणारा असल्याचे नेहमीच दिसत आले आहे. आता स्वतःची कुराड स्वतःच्या पायावर मारून बसला नाहीतर आज मानवतावादी महापुरुषांचा संतांचा महाराष्ट्र मनुवादी पेशव्यांच्या हाती गेला नसता
काँग्रेसी नेत्यांनीच नीच शब्द आणला आणि पाळला कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांची ओळख भारतात मागास जातीचे नेता असा प्रचार काँग्रेसनेच जिवंत ठेवला भंडारा लोकसभा 1954 ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात भाऊराव बोरकरला लढवून याच प्रफुल पटेलच्या खानदानीने तेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला. जे प्रफुल पटेल आज पेशव्यासोबत अजित पवार राष्ट्रवादीत आहेत. कालचे काँग्रेसी होत .यांनी तिरांग्यावरील भगव्या रंगाला, बुद्धाच्या शुद्ध पांढऱ्या रंगाला ,आणि हरित क्रांतीच्या हिरव्या कृषिप्रधान श्रमन संस्कृतीला कलंकित केले. मूळ धम्मचक्र भारतीय संस्कृतीचे हे दुश्मन आज मनुवादी प्रवृत्ती महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेत ही सर्व काँग्रेसचीच नालायकी होय
तेव्हाच भीम बा ला जर जातीने छळले नसते , तर स्वतंत्र भारताचे घर आज जळले नसते,
घेतले जर असते समजून त्यांच्या शब्दांचे मर्म ,तर देशात सत्तेत असता आज बुद्धांचा मानवतावादी धर्म ,
वैरत्व काय असते हे कुणाही कळले नसते , स्वतंत्र भारताचे घर आज जळले नसते
- अनिरुद्ध शेवाळे
- 9823368332, 9146867692
0 टिप्पण्या