Top Post Ad

भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच


 परभणी येथे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा शव विच्छेदन अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये त्यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाणीच्या खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचे अहवालात म्हटले आहे.  संविधानाची विटंबना झाल्याने परभणी शहरात आंबेडकरी जनतेने निषेध आंदोलन केले. यामध्ये पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अनेक निरपराध तरुणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. यामध्ये सूर्यवंशी यांचा समावेश होता. त्यांचा रविवारी.15 डिसेंबर रोजी पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर परभणी शहरात दाखल झाले .  ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा  पोस्टमार्टम ऑन कॅमेरा करावा अशी मागणी केली. तसेच सूर्यवंशी यांना आम्ही न्याय मिळवून देऊ. त्यांच्या न्यायासाठी लढा देणार असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

 परभणीत काही देशद्रोही प्रवृत्तींनी जाणिवपूर्वक संविधान प्रतिकृतीची मोडतोड करून विटंबना केली. त्याच्या निषेधार्थ परभणी येथे काही समाजकंटकांनी जाणिवूर्वक दंगल घडवून आणली. मात्र त्यात पोलिस प्रशासनाने कोंबिग ऑपरेशनद्वारे अनेक भीमसैनिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात डांबले. त्यामध्ये  कायद्याचे शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी हा युवकही होता, परभणी घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्च्यात सहभागी भीमसैनिकांना पोलीस नियमांचे उल्लंघन करून कशाप्रकारे बेदम मारहाण करतात याचा व्हीडिओ त्याने बनवला होता, म्हणून पोलिसांनी अचानक त्याच्या घरी धाड टाकून तो जेवण करत असतानाच त्याला घरातून उचलून नेले, न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतरही न्यायालयीन कोठडीतून त्याची सुटका करण्यात आली नाही.  पोलिसांनी केलेल्या अमानुष बेदम मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या तरुण भीमसैनिकाचा दुर्दैवी अंत झाला. याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि अनेक संविधानरक्षक प्रेमी  संघटनांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.  

त्या अनुषंगाने शिवडी विभागातील बौद्धजन पंचायत समिती गटक्रमांक १३, रिपब्लिकन सेना, वंचित बहुजन आघाडी आणि इतर संघटनांनी या बंदमध्ये उतरून बंदला उस्फुर्त प्रतिसाद दिला, सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, गटक्रमांक १३ चे गटप्रमुख राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, विभागीय कोषाध्यक्ष प्रविण तांबे, राजाभाऊ शेळके, निवडणूक मंडळाचे सदस्य अशोक कदम, रिपब्लिकन सेनेचे अविनाश मोहिते, अंकुश व रिपब्लिकन सेनेचे इतर कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातील दुःख व प्रक्षोभ व्यक्त करणारे निवेदन शिवडी विभागातील किडवाई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी रणदिवे यांना सादर करण्यात आले.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com