खरघर नवी मुंबई येथील शांताबाई रामराव सभागृह, सत्याग्रह कॉलेज, पोलीस ठाणे जवळ, खारघर येथे महाविद्यालयाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका, भारत सरकार, विविध सरकारी उद्योग व्यवसाय आणि बँक द्वारे शालेय आणि महाविद्यालयीन विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या अनेक योजना खुल्या , अनुसूचित जाती, जमाती व ओबीसी साठी दिल्या जातात या योजनेचा लाभ अनेक कारणामुळे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे गुरुवार दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शिष्यवृत्ती योजनाबाबतची कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत शिष्यवृत्तीसाठी लागणारी कागदपत्रे कशी अवगत करावी, उत्पन्नाची मर्यादा किती आहे तसेच सर्व जाती जमातीच्या आर्थिक दुर्बलांना उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्था, सरकारी उद्योग व्यवसाय आणि बँकेद्वारे अनेक योजना आहेत.
नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, द्वारे सुद्धा शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीचा अर्ज ऑन लाइन भरावा लागतो. अनेक विद्यार्थी माहिती अभावी लाभ घेऊ शकत नाहीत म्हणून सत्याग्रह कॉलेज च्या वतीने ही कार्यशाळा आयोजित केली आहे. या कार्यशाळेत ऍड. एस. आर . वाघोदे, (माजी उपसंचालक व्यवसाय आणि शैक्षणिक संचालनालय महाराष्ट्र शासन, दिनेश डिंगळे माजी सह सचिव , सामाजिक न्याय, प्राचार्या वनिता सूर्यवंशी, तुकाराम कांबळे, हर्ष कांबळे संगणक तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन या कार्यशाळेत दिले जाणार आहे, याचा सर्व संवर्गातील विद्यार्थ्यानी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ . जी के. डोंगरगावकर यांनी केले आहे.
शासनाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विध्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या वतीने ६० हजार रूप वार्षिक रक्कम दिली जाते तसेच राहुल शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने यशोधरा मुलीचे हॉस्टेल, स्वातंत्र्य सेनानी रामराव हरिराव हॉस्टेल खारघर आणि तळोजे नवी मुंबई येथे गरजू मुली आणि मुलांना निवासाची सोय करण्यात आली आहे याचा लाभ घ्यावा. असे आवाहन . डॉ . जी के. डोंगरगावकर यांनी केले आहे.
0 टिप्पण्या