परभणीत काही देशद्रोही लोकांनी संविधान शिल्पाचा अवमान केल्यानंतर जो उद्रेक झाला त्याचे पडसाद संसदेत उमटले. संसदेतही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली, हे प्रकरण आता अधिक चिघळू नये इथल्या व्यवस्थेने नेहमीप्रमाणे त्याला नवीन पर्याय दिला. संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकर आंबेडकर एवढ्या वेळेत बोलता तेवढ्या वेळी देवाचे नाव घेतले असते तर स्वर्ग मिळाला असता, असे विधान करून नवीन वाद निर्माण केला. याची संतप्त प्रतिक्रिया देशभरात काही क्षणातच उमटली. अनेक छोट्या मोठ्या संघटनांनी या घटनेचा निषेध केला आहे. मुंबईतील आझाद मैदान परिसरातील काँग्रेस भवन येथेही मुंबई काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन आझाद मैदानाकडे जात असताना पोलिसांनी मात्र त्याला गेटजवळच रोखून धऱले. मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष कचरू यादव यांच्या नेतृत्वाखाली तृषार गायकवाड, महेंद्र मुणगेकर, राजेश इंगळे, हिना गाजली, निजामुद्दीन रईस, आदी अनेक काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते.
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उच्च- नीच, जात- पात यांची बंधनं तोडून प्रत्येकाला आपण सर्वप्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहोत अशी शिकवण दिली. बाबासाहेबांनी आरएसएसच्या मनुवादी विचारसरणीला संविधानाच्या माध्यमातून या देशातून कायमचे हद्दपार केले आहे. जे बाबासाहेबांनी देशासाठी केलं ते या मनुवाद्यांच्या सात पिढ्यांना तर सोडाच पण पुढच्या शंभर पिढ्यांनाही साध्य करता येणार नाही. बाबासाहेबांनी बहुजनांवर होणाऱ्या अन्यायाला कायमच "आउट ऑफ फॅशन" केलं. नेमकी हीच बाब आजही आरएसएस आणि भाजपला खटकते. म्हणूनच अशा तऱ्हेने ते बाबासाहेबांचा अपमान करत असल्याचे वक्तव्य कचरू यादव यांनी यावेळी केले.बाबासाहेबांनी देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय मिळवून दिला. पण ज्यांना अन्याय करण्याची सवयच झाली आहे, त्यांना ते कसं पचेल? म्हणूनच कधी ते संविधान मान्य नसल्याचं सांगतात, कधी बाबासाहेबांचा पुतळा जाळतात, तर कधी संविधान बदलण्याचं वक्तव्य करतात. आरएसएस आणि भाजपकडून बाबासाहेबांचा आणि आंबेडकरी चळवळीचा सतत अपमान करण्यात आला आहे. त्यांच्या वक्तव्याचा जितका निषेध करता येईल तितका कमी आहे. बाबासाहेब आमचे आराध्य दैवत व आमची अस्मिता आहेत. आमच्या अस्मितेवर तुम्ही घाला घालण्याच्या प्रयत्न करत आहात जे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. अमित शहा यांनी त्यांच्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देशासमोर माफी मागितली पाहिजे. अशी मागणीही यादव यांनी केली.
आंबेडकर,,,,,,,,,,, विचार आहे म्हणून देश चालला आहे, गुज्जुभाया तुझ्या हातात जी सत्ता आहे ना ती केवळ आंबेडकर या एकच नावाने आहे. खबरदार .संविधानाला हिंदू मुसलमान अथवा कोणताच भेदभाव चालत नाही .मानवमुक्तीचा विचार कधीच मरत नाही, तु देवाचे नाव घेत लवकर स्वर्गात जा येथे तुझे बापजादे वाट बघत बसले आहेत. मात्र बाबासाहेब हा एक विचार आहे. मानवतेच्या कल्याणाचा तो कधीही बंदीस्त होऊ शकत नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो. भले त्याला काही काळ जातो. पण विजय निश्चितच असतो. अनेक प्रकारे इथल्या सडलेल्या विचारांनी बाबासाहेबांच्या मुर्तीला अपमानित केले. आजही करत आहेत. एकीकडे राजकीय फायद्यासाठी बाबासाहेबांचा उदो उदो करायचा आणि दुसरीकडे बाबासाहेबांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यास मेंदूं गहाण ठेवलेल्या अंधभक्तांना प्रवृत्त करायचे हे राजकारण आता नवीन राहिलेले नाही. संविधानाचा उदो उदो करून त्याच्यातील एक एक कायदा पायदळी तुडवण्याचे षडयंत्र सध्या कसे छुप्या पद्धतीने सुरु आहे हे आता न कळायला इथली आंबेडकरप्रेमी जनता खुळी नाही. मात्र शासन आणि प्रशासनावर आंबेडकरद्वेष्टी व्यवस्थेचा पगडा असल्याने आंबेडकरप्रेमी जनता हतबल आहे. खरं तर बाबासाहेब त्यासाठीच म्हणाले होते. शासनकर्ती जमात बना. त्यासाठी सर्व मार्ग तयार करून ठेवले होते. फक्त त्यावर मार्गक्रमण करणं आपलं कर्तव्य होतं. परंतु ते काही आमच्याकडून झाले नाही. किंवा आम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्याचा परिणाम आज सर्वत्र दिसत आहे. - प्रा चंद्रभान आझाद.शिवसेना प्रवक्ता
0 टिप्पण्या