26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी २ वर्ष ११ महिने १८ दिवस परिश्रम करून सविधान तयार केले व २६ नोव्हेबंर १९४९ रोजी संविधानाची प्रत करून त्यावेळचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू,सरदार वल्लभभाई पटेल,मौलाना यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रपती डॉ.राजेद्रं प्रसाद ह्याकडे सुपूर्द केली. तो दिवस 26 नोव्हेंबर होता. आज सुवर्ण महोत्सवी वर्ष अर्थात ७५ वा वर्धापन दिन ..भारतामध्ये विविध राज्यात सविधान दिन साजरा केला गेला यावेळी शाळा महाविद्यालयामध्ये संविधानाचे पठण करण्यात आले.
धारावी येथील मुकुंद नगर ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असलेल्या संविधान स्तंभाला मनपा जी/ उत्तर घ.क.व्य. विभाग व प्रज्ञा प्रतिष्ठान यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या संकल्पना निर्मितीतून धारावीतील या चौकात विधानसभा उभारण्यात आला होता. संविधान दिनाच्या औचित साधून मनपा जी/उत्तर घ.क.व्य.चे साहाय्यक मुख्य पर्यवेक्षक. किरण पाटील. पर्यवेक्षक वावेकर साहेब, प्रज्ञा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल शिवराम कासारे, तायडे, कनिष्ठ पर्यवेक्षक गडकरी, तांबे, मदगे, जाधव, कडाळी, चव्हाण, धारावीचे सर्व मुकादम चौकीचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संविधान स्तंभाला अभिवादन करण्यात आले
0 टिप्पण्या