Top Post Ad

मामा नगर येथे भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा

मामा नगर, विरार पूर्व येथे विभागातील सामाजिक संघटना यांच्या वतीने २६ नोहेंबर रोजी, संविधान दिन, ७५ वर्षे होत असल्याने अमृत महोत्सव साजरा करण्यात आला  कार्यक्रमाला विभागातील समाजसेविका सौ मनिषा विकास पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला बौद्धजन पंचायत समिती शाखा ८३१ चे अध्यक्ष मुकुंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे आणि आजच्या दिवसाचे महत्व सांगितले, यावेळी सुरभी काळसेकर यांच्या समवेत संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले सदर कार्यक्रमाला महिलांची संख्या लक्षणीय होती.

 


  माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्षा उर्मिला काकडे आणि पदाधिकारी यांनी सौ मनिषाताई यांचे स्वागत करून संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला, तसेच अनिल जाधव यांनी संविधानाचे महत्त्व आणि ते तयार करण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान यावर सविस्तर माहिती दिली तसेच जसे राज्यघटना सर्व नागरिकांना संरक्षण आणि अधिकार देते तसेच त्या मध्ये सर्व नागरिकांची कर्तव्य आणि जबाबदारी सुध्दा सांगितली आहे त्याचे सर्वांनी पालन केले पाहिजे असे नमूद केले.

या कार्यक्रमाला श्री साईदत्त सेवा मंडळाचे खजिनदार दिपक माळी, जयमल्हार मामा सेवाभावी संस्थेचे उपसचिव ज्ञानदेव अपराज, चंद्रकांत साटम, मनिषा इंदुलकर इतर मान्यवर उपस्थित होते त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी विजय काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सदर कार्यक्रमाला विभागातील रहिवाश्यांनी उपस्थिती नसल्या बद्दल खंत व्यक्त केली व २६ जानेवारी पेक्षाही मोठे कार्यक्रम या दिवशी संपूर्ण देशात केले पाहिजेत असे आव्हान केले, तसेच समाजसेविका मनिषाताई पाटील यांच्या मार्फत विभागात राबविण्यात येणारे सामाजिक उपक्रम, मतदार नोंदणी, रोजगार मेळावा यासारख्या अनेक गोष्टींचा रहिवाश्यांनी लाभ घ्यावा असे सांगितले आणि सदर कार्यक्रमाला उपस्थितांचे आणि सहकार्य केलेल्या सगळ्याचे आभार मानले.सर्वांना लाडू वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com