Top Post Ad

घराणेशाहीमुळे धारावीतून बसपा चे मनोहर रायबागे यांचे पारडे जड

चलेगा हाथी उडेगी धूल... ना रहेगा पंजा ना रहेगा कमल का फूल याची प्रचिती सध्या धारावी विधानसभा क्षेत्रात येत आहे. घराणेशाहीत अडकलेल्या काँग्रेसने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना डावलून आयात उमेदवार दिल्याने नाराज कार्यकर्त्यांनी थेट बसपाचे उमेदवार मनोहर रायबागे यांना पडद्यामागून पाठींबा दिल्याने रायबागे यांचे पारडे जड झाले आहे. महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवार मिळवण्यासाठी प्रत्येकाची तारांबळ उडाली. मात्र आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतून कोणाला उमेदवारी मिळणार आणि कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र आता जवळजवळ निवडणुकीचा अर्ज भरण्याची मुदत संपण्या अगोदर महाविकास आघाडी कडून काँग्रेसच्या डॉ. ज्योती गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली व त्यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. तसेच बहुजन समाज पक्षातून धारावीतील कार्यसम्राट समाजसेवक,बसपाचे उमेदवार मनोहर रायबागे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला. आपला सामना कुणाशी नसून आपण बसपामुळे सक्षम असल्याचे रायबागे यांनी यावेळी सांगितले.  

 रायबागे यांना शिंदे गटातून उमेदवारी देण्यात येणार होती.मात्र त्यांनी ते नाकारली आणि धारावीतील त्यांच्या समर्थकाबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दर्शवली.याच वेळेला त्यांना बहुजन समाज पक्षाने आपली उमेदवारी बहाल केली.  महाराष्ट्रातून बसपाचा पहिला आमदार धारावीतून निवडला जाणार याची खात्री असल्यामुळे रायबागे यांना उमेदवारी देण्यात आली. रायबागे यांनी धारावीमध्ये अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले, आर्थिक मदत केली, अनेकांच्या अडचणी सोडवल्या आहेत. त्यामुळे त्यांची जनमानसात एक चांगली प्रतिमा असल्यामुळे धारावी मध्ये अठरापगड जातीचे लोक असले तरी मुस्लिम बांधवांनी सुद्धा रायबागे यांना आपण शिंदे गट किंवा भाजपा कडून निवडणूक लढवू नका. तुम्ही इतर कोणत्याही पक्षातून उभे राहा आमचा तुम्हाला पाठिंबा असेल. धारावीतील जनतेचा रायबागे यांना छुपा पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळत असून जरी उघड उघड जनता इतरांचे नाव घेत असले तरी मतदान हे मनोहर रायबागे यांना करणार. त्यामुळे धारावीतील जनतेच्या मनातील आमदार हे रायबागे ठरतील असे काही प्रमाणत चित्र दिसत आहे. 

महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्यामुळे शिवसेना उभाठा गटातर्फे धारावीतून बाबुराव माने यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ए.बी. फॉर्म देण्यात आला असल्याची खात्रीशीर माहिती आहे. त्यामुळे ही लढत मैत्रीपूर्ण होऊ शकते म्हणजेच सांगली पॅटर्न राबवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.आणि याचाच फायदा  रायबागे यांना होणार अशी चर्चा धारावीमध्ये होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com