दहा ऑक्टोबर या जागतिक बालकामगार निषेध दिनानिमित्त नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स वेलफेअर ट्रस्ट तर्फे रविवार १३ ऑक्टोबर रोजी मुंबईत बाल कामगार आणि इतर मुलांचा एक भव्य मोर्चा काढण्यात आला. मुलांना बालमजुरीपासून दूर करून त्यांना शिक्षणाकडे नेणे, मुलांचे शोषण,बाल हक्कांचे उल्लंघन अशा अनेक समस्यांना आळा बसवून बालस्नेही आणि सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी ह दिवस पाळला जात असल्याचे मोर्चाचे समन्वयक आशिष शिगवण यांनी सांगितले. हा दिवस लक्षात घेऊन नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स वेल्फेअर ट्रस्टतर्फे १३ ऑक्टोबर २०२४ रोजी गोरेगाव लिंक रोडवरून भगतसिंग नगर क्रमांक १, भगतसिंग नगर २ मार्गे गणेश मैदानापर्यंत ३०० मुलांचा जनजागृती मोर्चा काढण्यात आला. ज्यात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव येथील विविध झोपडपट्ट्यांतील मुलांनी सहभाग घेतला आणि घोषणा दिल्या ' बंद करा, बंद करा, बालमजुरी बंद करा.
0 टिप्पण्या