प्रादेशिक होमिओपॅथी संशोधन संस्था, नवी मुंबई होमिओपॅथि शास्त्रामध्ये आरोग्य सेवा आणि संशोधनात नवीन मानक स्थापित करत आहे. गेल्या 100 दिवसांमध्ये, संस्थेने होमिओपॅथिक चिकित्सा पद्धतीने विविध रुग्णांना आरोग्य सेवा पुरवून तसेच विविध सार्वजनिक आरोग्य कार्यक्रमांमध्ये सहभागी होत मुंबई तसेच मुंबईच्या आसपासच्या परिसरात प्रगती आणि समर्पणाचे उल्लेखनीय कार्य केले आहे. या कार्याची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी याकरिता संस्थेच्या वतीने आज मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ.रमेश बावस्कर, बिरेंद्रसिंग, विनयकुमार अलोक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेल्या शंभर दिवसांमध्ये संस्थेतर्फे सर्वसामान्य लोकांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्याच्या हेतूने विविध उपक्रम तसेच दैनंदिन आरोग्यासाठी काही सार्वजनिक कार्यक्रम हाती घेतले असल्याचेही बाविस्कर यांनी सांगितले.
गेल्या शंभर दिवसांमध्ये 8157 रुग्णांना (ज्यामध्ये 3714 पुरुष 4416 महिला) बाह्य रोगी विभागामध्ये फक्त वीस रुपये नाम मात्र शुल्क घेऊन होमिओपॅथी औषधासह उपचार करण्यात आले तसेच विशेष तरतुदी अंतर्गत दारिद्रय रेषेखालील रुग्णांसाठी ही सेवा मोफत पुरवण्यात आली. तसेच वृद्ध रुग्णांवर विशेष लक्ष देण्यात आले. संस्थेमध्ये एकूण 1994 वृद्ध रुग्णांवर उपचार करण्यात आले आणि उच्च रक्तदाबासाठी विशेष तपासणी करण्यात आली. होमिओपॅथीमधील त्वचाविज्ञान आणि संधिवातविज्ञान या शाखांसाठी विशेष रुग्णविभाग कार्यरत आहेत या विभागांमध्ये गेल्या शंभर दिवसात 127 जणांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. दाट लोकवस्ती असलेल्या विभागासाठी विपश्यना बुद्ध विहार, सिद्धार्थ कॉलनी, चेंबूर, मुंबई आणि महाराष्ट्र दक्षता पोलीस सोसायटी रमाबाई कॉलनी, मुंबई येथे दोन होमिओपॅथिक बाहा रुग्ण विभाग सुरु करण्यात आले आहेत. या उपक्रमाचा विविध कुटुंबांना फायदा झाला. अशी माहिती बाविस्कर यांनी दिली.
पनवेल महानगरपालिकेच्या बारघर जोड येथे सफाई कर्मचाऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी व होमिओपॅथी उपचार देण्यात आले. राष्ट्रीय पोषण महा उपक्रमांतर्गत संस्थेने 250 हून अधिक व्यक्तीपर्यंत पोहोचून त्यांना सकस आहार आणि योग्य पोषणाबाबत शिक्षित केले. मासिक पाळीबद्दलच्या सामान्य आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध शाळांमध्ये शिक्षक/मुर्तीसाठी अभिमुखता/संवेदनशीलता कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते सामध्ये विविध प्रकारचे पत्रके/माहिती साहित्य इंग्रजी आणि मराठीमध्ये वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाचा एकूण 401 मुलींनी लाभ घेतला. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभात विद्यार्थी आणि रुग्णांसाठी ऑनलाइन व्याख्यानांसह विविध उपक्रम राबवण्यात आले. संस्थेतील सर्व कर्मचारी/उपस्थित रुग्णांसाठी सदगुरु योगीराज डॉ. मंगेशदा यांचे "किया योग" या विषयावरील भाषण आयोजित करण्यात आले होते. संस्थेतील सर्व कर्मचारी व रुग्णांसाठी योग सत्राचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 330 लाभाथ्यांनी याचा लाभ घेतला.
संस्थेला National Accreditation Board for Hospitals and Healthcare कडून प्रतिष्ठित असे एन.ए. बी. एच (NABH) प्रमाणपत्र मिळाले आहे. याचा परिणाम म्हणून रुग्णाला देत असलेल्या सेवा ह्या रुग्णालये आणि आरोग्य सेवांसाठी राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या मानकांनुसार सुव्यवस्थित केल्या जातात. पॅथॉलॉजी प्रयोगशाळेच्या सेवांसाठी नेशनल ऐक्रिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँड कॅलिब्रेशन यांच्याकडून एन. ए. बी. एल. मान्यता प्रमाणपत्र मिळण्याची प्रतीक्षा. आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून नाशिक येथे आयोजित आरोग्य मेळ्यामध्ये भाग घेतला यामध्ये आयुष पद्धतीविषयी तसेच होमिओपॅथी बद्दल एकूण 1500 अभ्यागतांना जागरुक करण्यात आले. तसेच काही गरजू रुग्णांना होमिओपेथिक औषध उपचार देण्यात आले. 2024 (मोहिम) स्वच्छता ही सेवा-2024 अंतर्गत विविध कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेण्यात आले उदा. स्वच्छता की भागिदारी, संपूर्ण स्वच्छता आणि सफाई मित्र सुरक्षा शिदिर, या उपक्रमांतर्गत स्वच्छतेचे महत्त्व, जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत एकूण 11 उपक्रम राबविण्यात आले असून, 780 लोकांना या उपक्रमाचा लाभ झाला.
प्रादेशिक होमिओपेथी संशोधन संस्था, नवी मुंबई, हे महाराष्ट्रातील होमिओपॅथीसाठी पेरिफेरल फार्माकोव्हिजिलन्स कैद्रांपैकी एक आहे. या कार्यक्रमांतर्गत रुग्ण, होमिओपॅथिक विद्यार्थी आणि सामान्य लोकांसाठी फार्माकोव्हिजिलन्सबद्दल जागरुकता उपक्रम आयोजित केले जातात एकूण 462 सहभागीनी याचा लाभ घेतला. औषधांच्या प्रतिकूल प्रतिक्रियांचा अहवाल आणि सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणारे जाहिरातीदार यावर कारवाई करण्यासाठी या कार्यक्रमांतर्गत विशेष प्रयत केले जातात. नशा मुक्त भारत या अभियाना अंतर्गत कार्यालयातील कर्मचारी तसेच रुग्णांमध्ये जनजागृती करण्यात आली. "राष्ट्रीय अवय आणि ऊतक प्रत्यारोपण संस्था बाबत कर्मचारी आणि रुग्णांना जागरुकता करण्यात आली. रुग्ण/कर्मचाऱ्यांना ह्या पोर्टलवर अवय दानासाठी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण 80 जण सहभागी झाले होते. संस्था होमिओपॅथी तसेच सार्वजनिक आरोग्यामध्ये विविध उपक्रमा अंतर्गत संशोधन करीत आहे. या व्यतिरिक्त विविध होमिओपॅथी औषध सिद्ध करण्यासाठी मनुष्यबळाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यशाळा आयोजित करून महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
प्रतापराव जाधव राज्यमंत्री, आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) भारत सरकार तसेच डॉ. सुभाष कौशिक, महासंचालक, केंद्रीय होमिओपेथी संशोधन परिषद, आयुष मंत्रालय, भारत सरकार (CCRH) च्या मार्गदर्शनाखाली सी.सी.आर.एच. ने होमिओपॅथिक संशोधनात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे.सी.सी.आर.एच.ने गेल्या 100 दिवसांमध्ये, क्लिनिकल, मूलभूत आणि औषध मानकीकरण क्षेत्रात 45 नवीन संशोधन अभ्यास सुरू केले आहेत. सी.सी.आर.एच. ने आपल्या देशाचे होमिओपॅथी संशोधनांमध्ये अव्वल स्थान राखण्यासाठी देशामध्ये तसेच देशाबाहेर विविध संस्था बरोबर सहकार्य करार केले आहेत, त्याचाच एक भाग म्हणून सी सी आर एस ने रॉयल लंडन हॉस्पिटल ओफ इंटिग्रेटेड मेडिसिन ह्या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर सहकार्य करार केला आहे. सी सी आर एस ने तांत्रिक क्षेत्रामध्ये सुद्धा मोलाची प्रगती केली असून आयुष हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फोर्मेशन सिस्टीम (A-HMIS) ची 20 संस्थांमध्ये अंमलबजावणी करण्यात आलेली आहे याद्वारे गेल्या शंभर दिवसांमध्ये 150000 हजार हून अधिक रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे. परिषदेने 49 वेबिनार आयोजित करून होमिओपॅथीचे ज्ञान 16 हजार हून अधिक सहभागी लोकांपर्यंत जागतिक स्तरावर सर्व दूर पोहोचवले.
आयुष मंत्रालय, भारतभर पारंपारिक औषध प्रणालीमध्ये क्रांती करत आहे. व्हिएतनाम बरोबर औषधी वनस्पतीवर तसेच आयुर्वेद तथा भारतीय चिकित्सा पद्धतीला जागतिक पातळीवर मान्यता मिळवण्यासाठी मलेशिया बरोबर ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करणे हे प्रमुख कामगिरींपैकी काही आहेत. मंत्रालयाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) अंतर्गत 170 आयुष पॅकेजेस समाविष्ट करून आयुषला राष्ट्रीय आरोग्य सेवा फ्रेमवर्कमध्ये समाविष्ट केले आहे. आरोग्य आणि प्रतिबंधात्मक काळजी उपक्रमांचा एक भाग म्हणून, मंत्रालयाने "हर घर आयुर योग" सारख्या राष्ट्रीय मोहिमा सुरु केल्या, ज्याने समाजामध्ये योग विज्ञानाला प्रोत्साहन दिले गेले. फिट इंडिया चळवळीचा एक भाग म्हणून, तसेच या व्यतिरिक्त, "भारत का प्रकृती परिक्षण", उपक्रम भारताच्या नैसर्गिक वारशाचा आरोग्य आणि निरोगीपणाशी संबंध जोडतो. मंत्रालयाने वृद्ध लोकांसाठी 14,692 आयुष आरोग्य शिबिरे आयोजित करून आपले उद्दिष्ट पार केले आहे, 10,000 शिविरांचे प्रारंभिक उद्दिष्ट लक्षणीयरित्या ओलांडले आहे.
प्रादेशिक होमिओपेथी संशोधन संस्था, नवी मुंबई, अंतर्गत केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद, आयुष मंत्रालय, भारत सरकार, तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे आयुष पद्धतीचा आपल्या देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार आणि प्रसार करण्याच्या विलक्षण दूरदृष्टीबद्दल मनपूर्वक आभार. तसेच प्रतापराव जाधव राज्यमंत्री, आयुष मंत्रालय (स्वतंत्र प्रभार) भारत सरकार, यांचे सुद्धा त्यांनी संपूर्ण देशामध्ये आयुष पद्धतीच्या वाढीसाठी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल आभार. डॉ. सुभाष कौशिक, महासंचालक, केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद, आयुष मंत्रालय, भारत सरकार (CCRH), यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची जनसेवा सुरु असल्याचेही बाविस्कर म्हणाले.
अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क साधाः प्रादेशिक होमिओपॅथी संशोधन संस्था, प्लॉट क्रमांक 38 आणि 39, सेक्टर-18, खारघर, नवी मुंबई-410210 rrihmumbai@yahoo.co.in ई-मेल: trihmumbalic@gmail.com भ्रमणध्वनी क्रमांक 9769888743
0 टिप्पण्या