वांद्रे येथील शिल्पकार महिला संघातर्फे आयोजित करण्यात आलेली बौद्धजन जागृती परिषद विभागातील बौद्ध बांधवांच्या उस्फुर्त प्रतिसादाने मोठ्या उत्साहात संपन्न झाली.कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची जयंती आणि धम्मचक्र परिवर्तन दिनाचे औचित्य साधून ही परिषद आयोजित करण्यात आली होती.वांद्रे (पूर्व) सिद्धार्थ नगर 'ब 'येथील शिल्पकार सांस्कृतिक प्रतिष्ठान संलग्न शिल्पकार महिला संघाने येथील प्रबोधनकार ठाकरे समाजमंदिरात प्रसिद्ध ऍड. विद्या तिरत्ने यांचे प्रमुख मार्गदर्शन आयोजित केले होते. यावेळी ऍड. त्रिरत्ने यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या सदाचारावर व स्वातंत्र्य समता बंधुत्वावर आधारित नव्या समाजाची रचना करणे हे बुद्ध धम्माचे प्रयोजन आहे या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी परिषदेचे अध्यक्षस्थान अदिती पवार यांनी भूषविले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी मोहिते यांनी केले तसेच संघमित्रा मयेकर यांनी आभार व्यक्त केले. या परिषदेसाठी मोठ्या संख्येने शिल्पकार महिला संघाच्या महिला कार्यकर्ता उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या