महायुतीप्रमाणे काँग्रेसमध्येही उमेदवारीसाठी पैशाचा घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप करीत मुंबई काँग्रेसचे नेते अॅड. रवी जाधव यांनी काँग्रेसला राम राम केला. काँग्रेस तर्फे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी वंचित आघाडी तर्फे कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. याबाबत त्यांनी मंगळवारी मुंबई मराठी पत्रकार संघात प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या एक वर्षापासून मी कुलाबा मतदारसंघात काँग्रेस तर्फे कार्य करत आहे या ठिकाणी काम करत असताना जनतेचा मला चांगला पाठिंबा मिळत आहे असे असताना मला सोडून काँग्रेसने इतर कार्यकर्त्याला उमेदवारी दिली सदरची उमेदवारी ही पैसे घेऊन देण्यात आली असा स्पष्ट आरोप जाधव यांनी केला. पन्नास खोके एकदम ओके असं म्हणत भाजपावर आगपाखड करणारी काँग्रेस आता तिकीट वाटप करतांना २५ खोके उमेदवार एकदम ओके असं का करत आहे असा सवालही जाधव यांनी केला. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी तर्फे कुलाबा मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहे त्यामुळे माझ्या तमाम प्रेमींनी मला सहकार्य करावे असे आवाहनही जाधव यांनी यावेळी केले.
आपल्या आयुष्याची हयात पक्षासाठी समर्पित करणारे सच्चे निष्ठावंत कार्यकर्ते तिकिटापासून वंचित राहू लागले तर त्यांना पक्ष सोडण्याशिवय पर्याय नसतो. काँग्रेस पक्षात असताना कुलाबा मतदार संघात सर्वसामान्य जनतेची कामे केली.रात्र दिवस पहिला नाही. मात्र जे खोक्याची भाषा करतात त्यांनीच खोके घेऊन मला तिकीट दिले नाही.कुलाबा मतदार संघात उमेदवार देताना आता जे काही काँग्रेसने केले ते योग्य नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षातून मी उभा राहिलो आहे पेशाने वकील असल्याने मतदार संघात मी जे काही काम केले व करणार होतो त्याचा फायदा काँग्रेसला झाला असता मात्र आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी या भागाचा विकास करणार.- अॅड.रवी जाधव
0 टिप्पण्या