Top Post Ad

शिंदे सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश


  काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते, माजी नगरसेवक हाजी बब्बू खान यांनी आज मुंबई काँग्रेस अधयक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी त्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भाजपा सरकार अदानीसाठी काम करत असून धारावीकरांना बाहेर हाकलण्याचे षडयंत्र सुरु आहे. धारावीच्या लोकांना मुलुंड, देवनार, कुर्ला, मालवणी आक्सा, मिठागरांच्या जागेवर विस्थापीत केले जात आहे. पण धारावीसाठी आपली लढाई अदानीच्या विरोधात सुरु आहे. विधानसभेच्या निवडणुकीत धारावीतून सर्वात जास्त मताधिक्क्याने आपला उमेदवार विजयी करायचा आहे. विधानसभेची ही निवडणूक लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी महत्वाची आहे. धारावीसाठी, मुंबईसाठी व महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मविआचे सरकार आणायचे आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करावे, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले.

हाजी बब्बू खान म्हणाले की, काँग्रेस पक्षच सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. काहीवेळेसाठी काँग्रेसमधून बाहेल गेले होते पण मनातून काँग्रेस कधीही गेली नाही. माझे व या सर्व   लोकांचे धारावीवर प्रेम आहे, सर्व लोक स्वतः उमेदवार समजून काम करतात. काँग्रेस पक्ष व खासदार वर्षाताई गायकवाड यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे राहू.या पक्षप्रवेशावेळी माजी मंत्री अस्लम शेख, आमदार अमिन पटेल, काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, विरेंद्र चौधरी, कचरू यादव, इब्राहिम भाईजान आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com