Top Post Ad

२४ वर्षांच्या संघर्षानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा

वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महापालिका उद्यानात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे मंगळवारी रात्री सर्वपक्षीय मान्यवरांकडून मोठ्या जल्लोषात अनावरण करण्यात आले. खार,वांद्रे आणि सांताक्रूझ येथील आंबेडकरी जनतेने बाबासाहेबांच्या येथील पुतळ्याची मागणी करीत गेली २४ वर्ष संघर्ष केला होता. वांद्रयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून या  पुतळ्याची उभारणी करण्यात आली.  

 


वांद्रे उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालिका उद्यानात गेली ४० वर्ष महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला भव्य कँडल मार्च काढून रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सामूहिक मानवंदना वाहिली जाते. त्यासाठी उद्यानात भव्य पुतळा असावा, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून करण्यात आली होती. दिवंगत शिवसेना आमदार बाळा सावंत आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पुतळ्यासाठी विशेष हातभार लावला. तसेच प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीने गेली २४ वर्ष पाठपुरावा करून अखेर आंबेडकरी जनतेची मागणी पूर्ण केली.  सुप्रसिद्ध मूर्तिकार स्वप्नील कदम यांनी हा पुतळा साकारला आहे. साडे तेरा फूट उंच आणि पंचधातूने हा पुतळा साकारण्यात आला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा दिशादर्शक बाबासाहेबांचा पुतळा पाहण्यासाठी आंबेडकरी जनतेने येथे गर्दी केली 

केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री, रिपब्लिक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते, आमदार अनिल परब, स्थानिक आमदार झिशान सिद्धीकी, बाबा सिद्धीकी, माजी आमदार तृप्ती बाळा सावंत, शशिप्रभू, सचिन सावंत, वरुण सरदेसाई, शिंदे शिवसेनेचे विभागप्रमुख कृणाल सरमळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण तांबे, सचिव सुदेश शिर्के, सुमित वजाळे, चंद्रशेखर सकपाळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण  संपन्न झाले.  लोकार्पण सोहळा साजरा होताना यावेळी संयोजकांच्या वतीने अत्यंत नेत्रदीपक विद्युत रोषणाई आणि विद्युत रोषणाईची अनोखी आतषबाजी आकाशात करण्यात आलेली अतिषबाजीमुळे पूर्ण परिसर उल्हासित जल्लोषित आणि भीममय झाला होता . अत्यंत सुंदर प्रेरणादायी पुतळा पाहण्यासाठी मुंबई उपनगरातील अनेक कार्यकर्ते आणि बांद्रा पूर्व खेरवाडी परिसरातील आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पाहण्यासाठी डोळ्यात प्राण आणून उभे होते . महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने झाला या सोहळ्यात झालेली रोषणाई आणि आतषबाजीने परिसर फुलून गेला होता. हा सोहळा अत्यंत नेत्रदीपक झाला.आपल्या प्राणप्रिय मुक्तीदाता डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा अत्यंत दिमाखदार पद्धतीने साजरा होत असताना सर्व उपस्थीत आंबेडकरी जनतेचा ऊर अभिमानाने भरून आला होता. सर्वांनी हा लोकार्पण सोहळा डोळे भरून पाहून मनाच्या कोंदणात साठवून ठेवला आहे.

श्रीकांत जाधव 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com