महाराष्ट्र चित्रपट,रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ अर्थात दादासाहेब फाळके चित्रनगरीत दीर्घकाळ मुदतीसाठी आरक्षित असणाऱ्या निर्मिती संस्थांना महामंडळाकडून उत्तम प्रतिच्या सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळ प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी केले.
गुरुवारी निर्मितीसंस्थाच्या प्रतिनिधीसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्रीमती पाटील बोलत होत्या. निर्मितीसंस्थांच्या प्रतिनिधीशी संवाद साधतांना श्रीमती पाटील म्हणाल्या की, यापुढे दर तीन महिन्यांनी आढावा बैठक आयोजित करून निर्मात्यांशी संवाद साधला जाईल. या संवादातून त्यांना भेडसावणाऱ्या समस्या आणि निर्माण होणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रशासनाच्या वतीने जलदगतीने पावलं उचलली जातील.अशी ग्वाही निर्मात्यांना देण्यात आली.
या बैठकीतून पार्किंग व्यवस्था, घन कचरा व्यवस्थापन, अग्निशमन व्यवस्थापन यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. धनंजय सावळकर, व्यवस्थापक ( कलागरे) सचिन खामकर, सहायक व्यवस्थापक ( कलागरे ) मोहन शर्मा, रुचिता पाटील , मुख्य सुरक्षा अधिकारी श्री. माने उपस्थिती होते.
-------------------------------
जनसंपर्क विभाग
दादासाहेब फाळके चित्रनगरी
0 टिप्पण्या