Top Post Ad

निवडणूक आयोगाचा अजब कारभार - दुबार मतदार घटण्याऐवजी वाढविले..


  ठाणे लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटण्याऐवजी वाढवली असल्याने आज पुन्हा एकदा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडणी करून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. निवेदन देतेवेळी शिवसेना नेते, माजी खासदार राजन विचारे, संपर्क प्रमुख नरेश मणेरा,  जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, केदार दिघे, सुरेश मोहिते, भास्कर बैरीशेट्टी, संजय दळवी, प्रतिक राणे, अमोल हिंगे, विश्वास निकम व इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. दिलेल्या पत्रामध्ये मागील दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीत १ लाख ६६ हजार ९१० दुबार नावांची प्रिंट कॉपी व सॉफ्ट कॉपी देण्यात आली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना ही सर्व नावे तातडीने पडताळणी करून वगळून टाकावी असे आदेश दिले असतानाही ही नावे वगळली नाही. तर वाढवली आहेत नुकताच दि. ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील केलेल्या सर्वेनुसार १ लाख ९३ हजार ३०२ दुबार नावे आढळून आलेली आहेत. म्हणजे एकूण २६३९२ नावे वाढली आहेत. यावर प्रचंड नाराजी दर्शवून प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. ही नावे वगळली नाहीत कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागावी लागेल असा थेट इशारा विचारे यांनी दिला आहे.

  • *पूर्वी*
  • १४५ मीरा भाईंदर विधानसभा – ३४३१०
  • १४६ ओवळा माजिवडा विधानसभा - २९०८२
  • १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा - २१३२०
  • १४८ ठाणे विधानसभा – १६७६०
  • १५० ऐरोली विधानसभा – ३९५९०
  • १५१ बेलापूर विधानसभा – २५८४८
  • *एकूण दुबार नावे – १६६९१०* 
  • *नंतर*
  • १४५ मीरा भाईंदर विधानसभा – ४६८९०
  • १४६ ओवळा माजिवडा विधानसभा – ४५७६६
  • १४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा – १७९९७
  • १४८ ठाणे विधानसभा – १३८११
  • १५० ऐरोली विधानसभा – ३९७६०
  • १५१ बेलापूर विधानसभा – २९०७८
  • *एकूण दुबार नावे – १९३३०२*
  • *एकूण वाढलेली दुबार नावे – २६३९२*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com