मागील अनेक दिवसांपासून बांगलादेशातील राजकीय घडामोडीचा फायदा घेत अल्पसंख्य असणाऱ्या शांतीप्रिय बौद्ध धम्मीयांवर तेथील धनदांडगे अमानुषपणे अन्याय अत्याचार करित आहेत. बौद्धांची घरे, दुकाने, उद्योगधंदे जाळपोळ करून नष्ट करण्यात आली आहेत. अनेकांची निघृणपणे हत्या करून बौद्धांची विहारे, स्तुप, ध्यान केंद्रे यांची जाळपोळ करण्यात येत आहेत. इतकेच नाही तर काही जमीनदोस्त करून नष्ट करण्यात आली आहे. बौद्धांच्या जमीनी बळकावून त्यांना विस्थापित करण्यात आले आहे. या अन्याय अत्याचारा विरोधात पुज्य भदन्त ग्यानकिर्ती यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मुंबई भिक्खू संघाचे अध्यक्ष भन्ते शान्तिरत्न यांनी केले आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ या आंदोलनाची माहिती त्यांनी आज प्रसिद्धी माध्यमांना दिली. यावेळी भन्ते लामा, आणि भिक्खू संघ, तसेच बौद्ध उपासक नितिनभाऊ मोरे, रवि गरूड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दि.१९ सप्टेंबर रोजी बांगला देशातील पर्वतीय परिसरात राहणाऱ्या अल्पसंख्य बौद्धांवर जाणीवपूर्वक, गुंडाणी आर्मीच्या सहाय्याने बौध्दांवर सशस्त्र हल्ला करून अनेकांना मारले. या घटनेत अनेक जखमीही झाले. गांवे नष्ट करण्यात आली. त्यांची साधन संपत्ती बळकावण्यात आली. जमीनीवर कब्जा करण्यात आला. परंपरागत बौध्द धम्मीयांचा ज्यावर अधिकार होता तो अधिकार दडपशाहीने आणि हिंसेच्या जोरावर बळकावण्यात येत आहे. परिणामतः बांगला देशात असणारा अल्पसंख्य बौध्द अनुयायी प्रचंड मानसिक दबावात आणि भितीमध्ये आपले जीवन जगत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा देउन आपले जगातील बौध्दांशी आपले भावणीक आणि धम्माचे नाते स्थापित केले आहे. आज बांग्लादेशातील बौद्ध समाजाचे जीवनमान संकटात आहे. अशा वेळी भारतातील बौद्धांनी त्यांना सहकार्य करणे गरजचे आहे. याकरिता या आंदोलनात सर्वांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
0 टिप्पण्या