*पुणे कॅन्टोन्मेंट व वडगाव शेरी विधानसभा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढविणार - अण्णासाहेब कटारे*
*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंटची विधानसभेची उमेदवारी पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ साबळे यांना जाहीर...*
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची राज्य कार्यकारणीची महत्त्वपूर्ण बैठक पुणे येथील श्रमिक पत्रकार भवन येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. पत्रकारांशी बोलतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. *मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण व मुंबई* या सर्वच विभागांमध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने आपली निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे. पक्षाचा प्रभाव असलेले विधानसभेचे मतदार संघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या ताकदीवर लढविणार असून त्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे.
*पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुणे कॅन्टोन्मेंट ची विधानसभेची उमेदवारी पक्षाने पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ साबळे यांना जाहीर केली आहे, व वडगाव शेरी विधानसभा मतदासंघ हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचेही अण्णासाहेब कटारे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.*
देशातील/राज्यातील सत्ताधारी अथवा विरोधी पक्ष या पक्षाची अवस्था दयनीय आहे समाज घटक या दोन्ही पक्षांवर कमालीचे नाराज आहेत. जनतेच्या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी केवळ एकमेकांवर आरोप /प्रत्यारोप करण्यातच धन्यता मानत आहेत.
प्रचंड वाढलेली बेरोजगारी, गगनाला भिडलेली महागाई, कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न, महिलांची सुरक्षितता, दलित मागासवर्गीयांवरील वाढते अन्याय, अत्याचार या बाबींकडे सत्ता पक्ष अथवा विरोधी पक्ष मात्र मुग गिळून बसले आहेत.
सुप्रीम कोर्टाने नुकतेच एस.सी /एस.टी वर्गीकरणाबाबत दिलेल्या निर्देशाबाबत विरोधी पक्ष अथवा सत्ताधारी पक्ष, गरीब घटकांच्या बाजूने बोलतांना दिसत नाही. वर्गीकरणामुळे एकत्र असलेला एस.सी /एस.टी समूह विखुरला जाईल अशी भीतीही असल्याचे अण्णासाहेब कटारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
👉🏻येणाऱ्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष स्वबळावर ताकदीने उतरला असून, गोरगरीब, दलित, बौद्ध, आदिवासी, मुस्लिम अल्पसंख्यांक, ओ.बी.सी. समूहांना देखील उमेदवारी देऊन त्यांना प्रतिनिधित्व देणार असल्याचे अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी सांगितले.
*या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शेषरावजी गणवीर,पुणे जिल्हाध्यक्ष सचिन भाऊ साबळे,मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोषजी मोकळे, महारष्ट्र युवा नेतृत्व बिपिन कटारे,संभाजीनगर (औरंगाबाद) माजी न्यायाधीश अँड. जे.जी घोरपडे साहेब, महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख तथा मुंबई प्रदेश महासचिव सचिन भाऊ नांगरे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष पांडुरंग जवंजाळ, मराठवाडा सरचिटणीस दर्शन कुमार इंगळे, संभाजीनगर युवा जिल्हा अध्यक्ष संदीप गायकवाड, उत्तर नागपूर अध्यक्ष गौतम सातपुते, मोहोळ तालुका अध्यक्ष शरद कांबळे, प्रशांत कटारे ,पुणे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल मोहिते, तळेगाव दाभाडे युवा शहराध्यक्ष सुनील करंजे,पुणे महिला जिल्हाध्यक्षा प्रीती ताई जगताप, सिध्दार्थ( सोन्या), जनार्दन कांबळे, अक्षय वाघमारे उपाध्यक्ष, कुणाल चव्हाण, महिला आघाडीच्या पुणे जिल्हा महासचिव अर्चनाताई कांबळे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.*
0 टिप्पण्या