दी मुंबई ऑब्सेट्रीक अॅन्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून दिनांक 27 सप्टेंबर रोजी मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये महिला सक्षमीकरण आणि जनजागृती कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली. प्रा.डॉ. सुवर्णा खाडिलकर, एचओडी प्रसूती व स्त्रीरोग, बॉम्बे हॉस्पिटल यांच्या नेतृत्वाखाली एसपी जैन सभागृह, बॉम्बे हॉस्पिटल, मरीन लाईन्स येथे "महिलांवरील हिंसाचार" या विषयावर आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि महिला डॉक्टरांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी रुग्णालयातील नर्सेस तसेच महिला कर्मचारी, महिला रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बॉम्बे हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोग विभागातील अनेक नामवंत डॉक्टर्स आणि मुंबई प्रसूती आणि स्त्रीरोग संघटनेचे सुप्रसिद्ध सदस्य. कराटे मास्टर महेश दावडे यांच्या आत्मसंरक्षणाच्या थेट प्रात्यक्षिकाने हा कार्यक्रम यशस्वी झाला संबंधित विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन निरीक्षक एसीपी अपर्णा जोशी यांनी केले, या कार्यक्रमाला डीन डॉ. सतीश खाडिलकर आणि संचालक राजकुमार पाटील. यांच्या मार्गदर्शनाखाली 150 पूर्व नोंदणीकृत आरोग्य सेवा कर्मचारी उपस्थित होते.
सर्व महिलांनी अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवला पाहिजे. अगदी बिनदास्तपणे पुढे आले पाहिजे. याबाबत महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम हिचा आदर्श सर्वांनी डोळ्यासमोर ठेवायला हवा. अतिशय प्रतिकूल परिस्थिती मेरी कोम हिने यशाचे उंच शिखर गाठले आहे. तीने जो आदर्श आपल्या समोर ठेवला आहे तो सर्वांना प्रेरणादायी आहे. त्याच आदर्श मार्गावर प्रत्येक महिलेने मार्गक्रमण करून आपला उत्कर्ष साधावा असे आवाहन बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉ. सुवर्णा खाडिलकर यांनी यावेळी केले.
लवकरच नवरात्री उत्सव सुरु होत आहे. यावेळी आपण ज्या दुर्गामातेची प्रतिष्ठापना करतो. त्यातून आपण एकच सांगू शकतो की, स्त्री अबला नसून ती सबला आहे. मात्र तीचे सशक्तीकरण करा. प्रत्येक स्त्रीने सशक्त झाले पाहिजे. दुर्गामातेमध्ये जेवढी ताकद आहे तेवढीच तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा सामना तुम्हाला करता आला पाहिजे. कोणताही अन्याय अत्याचार झाल्यास त्याबाबत बोलले पाहिजे. कोणाशीही बोलावे, आपली आई, बहिण, मैत्रीण कोणाशी तरी बोलून या अन्यायाबाबत वाचा फोडली पाहिजे. मात्र वेळ निघून गेल्यानंतर रडत बसण्यापेक्षा वेळीच यावर आवर घातला तर नक्कीच त्यातून मार्ग निघू शकतो. असे मत खाडिलकर यांनी व्यक्त केले.
महिला सक्ष्मीकरण, महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांबाबत जनजागृती करणे तसेच या विरोधात लढा उभारताना समाजाने हि निडरपणे सोबत असायला हवे. महिला डॉक्टर, नर्सेस, महिला कर्मचारी,महिला रुग्ण आणि सर्व महिलांनी अन्याय अत्याचारांविरोधात आवाज उठवला पाहिजे. महिलांनी आपले संरक्षण स्वतःच करायला शिकले पाहिजे. वेळात वेळ काढून व्यायाम, योगासणे करायला हवीत.मनाची एकाग्रता आणि खंबिरता वाढविण्यास व्यायाम महत्वाचा आहे.तसेच येणाऱ्या कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याची जिद्द मनात निर्माण व्हायला हवी. आपल्याला समाजातील दुष्ट शक्तींचा नायनाट करताना दुर्गादेवीचे रूप दाखवावे लागेल असे डॉ. रिना वाणी यांनी म्हटले.
महिलांच्या संरक्षणार्थ पोलीस दल हे पूर्ण क्षमतेने कार्यरत असून महिला अत्याचारासंदर्भात आलेल्या सर्व तक्रारीचा तपास गंभिरपणे करण्यात येऊन गुन्हेगाराला कायद्याने कठोर शासन व्हावे असा आमचा प्रयत्न असतो.महिलांनी त्यांना त्रास देणाऱ्यांच्या विरोधात पुढे येऊन तक्रार द्यायला हवी. पोलीस त्यांच्या सुरक्षिततेचे पूर्ण काळजी घेतील असे एसीपी अपर्णा जोशी यांनी म्हटले. तर कराटे मास्टर महेश दावडे यांनी या वेळी महिलांना आपली सुरक्षा करण्यासाठी खास काही टिप्स देत. काही विशेष हातांच्या हालचाली करीत समोरच्या आक्रमण करणाऱ्याला कसे रोखायचे आणि त्याला सोप्या पद्धतीने जमिनीवर लोळवायचे याचे प्रात्यक्षिक दाखवीत मनाने आणि शरीराने कणखर व्हा असा प्रेमळ सल्ला दिला.
0 टिप्पण्या