.राज्यातील भाजपा युती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने १ सप्टेंबर रोजी हुत्मामा चौक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंत ‘सरकारला जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले .
महाराष्ट्र व छत्रपती शिवाजी महाराज वेगळे करता येत नाहीत. महाराजांच्या पुतळ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते म्हणूनच तो कोसळला.भाजपा युती सरकारने महापाप केले त्याची शिक्षा घ्यावी लागणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राजीनामे - पाहिजेत. राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळाच कोसळलेला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला आहे, असा हल्लाबोल मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
महाराजांचा पुतळा कोसळल्याने जनतेत तीव्र संताप आहे. भ्रष्ट भाजपा सरकारविरोधात मविआने जोडे मारो आंदोलन केले. हुतात्मा पुतळ्याला अभिवादन करून सुरु झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार छत्रपती शाहू महाराज, खासदार संजय राऊत, सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, माजी मंत्री अस्लम शेख,अनिल देशमुख, आदित्य ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रा. वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, प्रतापगडावर शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते करण्यात आले, आज ६७ वर्षानंतरही तो पुतळा भक्कमपणे उभा आहे आणि राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला कारण यात भ्रष्टाचार केला. भाजपा सरकारने भ्रष्टाचारासाठी महाराजांनाही सोडले नाही. ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची व अस्मितेची आहे, भ्रष्टाचाराने बरबटलेला महाराष्ट्र बदलण्यासाठी ही लढाई आहे, असेही प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या.
0 टिप्पण्या